पुण्यात रस्त्यावर अश्लील चाळे करणाऱ्या गौरव आहुजाला पुणे पोलिसांनी रविवारी शिवाजीनगर येथील कोर्टात हजर केले. कोर्टाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. गौरवचा मित्र भाग्येश ओसवाल यालाही एक दिवसाची कोठडी सुनावण्यात आली आहे. उद्या त्यांना पुन्हा कोर्टात हजर केले जाईल.
Jagdeep Dhankhar Health : मोदींनी घेतली उपराष्ट्रपतींची भेटउपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे. त्यांच्या छातीत दुखू लागल्याने तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रुग्णालयात जाऊन धनखड यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. ते लवकर बरे व्हावेत, यासाठी त्यांनी प्रार्थना केली. याबाबत त्यांनी सोशल मीडियात माहिती दिली.
Chhagan Bhujbal : महात्मा जोतिबा फुले यांना भारतरत्न देऊन त्यांना खाली आणू नका; राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचे परभणीत वक्तव्यमहात्मा जोतिबा फुले यांना भारतरत्न द्या, हा एक विषय सुरू आहे. माझा त्याला काही विरोध नाही. विरोध करायला लागलो, तर अडचण होते. महात्मा मोठे की, भारतरत्न मोठे, छत्रपती छत्रपती आहेत. महात्मा फुले महात्मा आहेत. आपण त्यांना तिथून खाली आणणार आहात का? असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केले आहे.
Pune Police : पुण्यात वर्षभरात 40 पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्लेपुण्यात गेल्या वर्षभरात 40 पोलिसांवर हल्ले झाले असून, दोन वर्षांत पुणे शहर परिसरात हल्ला, तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी 40 गुन्हे दाखल झाले आहेत.
Ahilyanagar News Update : महापालिकेच्या मालकीच्या जागेत विनापरवाना बोअरवेल घेतला, आयुक्तांच्या आदेशानंतर थेट गुन्हा दाखल झालाअहिल्यानगर महापालिकेच्या मालकीच्या रस्त्यावर विनापरवाना बोअरवेल घेणाऱ्याविरोधात कठोर भूमिका घेत कारवाई केली आहे. प्रभाग अधिकारी राकेश कोतकर यांच्या फिर्यादीवरून विनापरवाना बोअरवेल घेणाऱ्याविरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
Beed Satish Bhosale : 'खोक्या'भाईमुळे आमदार धस, पोलिस निरीक्षक ढोकरड अडचणीत; आंदोलकांनी मोर्चात केली मोठी मागणीबीडच्या शिरूर तालुक्यामध्ये आज सतीश भोसले उर्फ खोक्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. खोक्याभाईसह भाजप आमदार सुरेश धस यांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आमदार धस यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. पोलिस निरीक्षक गणेश ढोकरड यांच्या निलंबनाची देखील मागणी करण्यात आली.
Somnath Suryawanshi : परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची छगन भुजबळांनी घेतली भेटन्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यु झालेल्या परभणीतील दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, आमदार राजेश विटेकर, रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी भेट घेतली. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या दोषींवरील कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे आश्वासन छगन भुजबळ यांनी दिले.
Beed Satish Bhosale : 'खोक्या'भाई हा वनविभागाच्या जागेत अतिक्रमण करू राहायचा; पोलिस निरीक्षक गणेश धोक्रड यांची माहितीसतीश भोसले ऊर्फ 'खोक्या' बीडच्या शिरूर तालुक्यातील झापेवाडी इथं वनविभागाच्या जागेत अतिक्रमण करून राहत असल्याची पोलिस निरीक्षक गणेश धोक्रड यांची माहिती. अनेक दिवसापासून खोक्यासह त्याचे कुटुंबाचे इथं वास्तव्यात होते. एवढे दिवस अतिक्रमण करून राहत असलेल्या खोक्याविरुद्ध वन विभागाने कारवाई का केली नाही, असा सवाल केला जात आहे.
Raju Shetti : शक्तीपीठ महामार्गावरून राजू शेट्टी यांची महायुती सरकारवर टीकाशक्तीपीठ महामार्गावरून राजू शेट्टी यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. आमची थडगी बांधून विकासाचे मनोरे बांधून तुम्ही ताजमहाल राहू नका, असे माजी खासदार राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.
Shivsena UBT : आदित्य ठाकरेंकडून जुन्या शिवसैनिकांचा सन्मानशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निर्धार शिबिर आज मुंबईत पार पडत आहे. या शिबिरात बोलताना युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जुन्या शिवसैनिकांच्या निष्ठेबाबत त्यांचे कौतुक केले आहे. तसेच, संजय राऊत यांच्या दिल्लीतील कामाबाबत भाष्य केले.
Raj Thackeray : आताच कोरोना गेलाय. त्याचं कुणाला देणं घेणं नाही...बाळा नांदगावकर यांनी कुंभमेळ्याहून येताना एका छोट्याश्या कमांडोलूमधून पाणी घेऊन आले. ‘मी म्हटलं हड... पाणी पिणार नसल्याचा स्पष्ट सांगितलं. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पाहिलेत. अनेक जण घासत, खाजवत होते आणि हे नांदगावकर म्हणतायत गंगेच पाणी घ्या.. कोण पिणार ते पाणी ? आताच कोरोना गेलाय. त्याचं कुणाला देणं घेणं नाही. दोन वर्ष तोंडाला फडकी लावून फिरला आहात आणि तिकडे जाऊन आंघोळ करत आहेत, असा शब्दांत राज ठाकरे यांनी नांदगावकर यांनी आणलेले पाणी पिण्यास नकार दिला.
Suresh Dhas : ज्यांना मोर्चे काढायचे आहेत, त्यांना मोर्चे काढू द्यावेत : सुरेश धसभाजप आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय असलेला सतीश भोसले ऊर्फ खोक्याभाई याच्या अटकेसाठी आज शिरूर पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. त्यावर ज्यांना मोर्चा काढायाचा आहे, त्यांना मोर्चे काढू द्यावेत, अशी भूमिका सुरेश धस यांनी मांडली. धस यांचा आष्टीत सध्या जनता दरबार सुरू आहे.
Buldhana News : क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर टालेंवर तडीपारीची कारवाईशेतकरी नेते रविकांत तूपकर यांचे विश्वासू असलेले आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर टाले यांच्यावर तडीपारीची कारवाई केली आहे. मेहकरचे उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी टाले यांना एका वर्षासाठी तडीपार केले आहे.
Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख खूनप्रकरणी सांगोल्यात कडकडीत बंदसंतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणी आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणाच्या निषेधार्थ आज सांगोल्यात मूक मोर्चा काढण्यात आला. बाजाराचा दिवस असूनही सांगोल्यात आज कडकडीत बंद पाळण्यात आला.
Yugendra Pawar : धनंजय मुंडेंना राजीनामा देण्यासाठी तीन महिने का लागले : युगेंद्र पवारसंतोष देशमुख खून प्रकरणाच्या चौकशीत माजी मंत्री धनंजय मुंडे हे दोषी आढळले तर त्यांना सहआरोपी करण्यात यावे. मुंडे यांना राजीनामा देण्यासाठी तीन महिने का लागली, असा सवाल युगेंद्र पवार यांनी केला. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज बारामतीत सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चात धनंजय देशमुख आणि देशमुख कुटुंबीय सहभागी झाले आहे.
MNS Anniversary : गुढी पाडवा मेळाव्यात दांडपट्टा फिरवणार; त्यामुळे आज चाकू सुरी कशाला काढू : राज ठाकरेआज मी फार काही बोलणार नाही. गुढी पाडव्याचा मेळावा 20 दिवसांवर आहे. तिकडे दांडपट्टा फिरवणार असेल तर इथे चाकू सुरी कशाला काढू. राजकारणाचा नुसता चिखल झाला आहे. एकमेकांची डोकी फोडत आहेत. हे लोकांना समजत नाही. सध्याचं राजकारण पाहिलं असता त्याला हंटरने फोडला असता. विषय भरकटवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी घडवत आहेत, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाच्या वर्धापनदिनाच्या मेळाव्यात पिंपरीत बोलताना केला.
MNS Anniversary live: 19 वा वर्धापनदिन चिंचवडमध्ये साजरा होणारपिंपरी-चिंचवडमध्ये मनसेच्या वर्धापनदिनानिमित्त राज ठाकरे यांची तोफ आज धडाडणार आहे. मनसेचा 19 वा वर्धापनदिन चिंचवडमध्ये साजरा होणार आहे. त्यासाठी राज्यातील सर्व मनसैनिक एकत्र येणार आहेत. त्यांना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे संबोधित करणार आहेत. चिंचवडच्या रामकृष्ण मोरे सभागृहात हा कार्यक्रम होत आहे.
State Cabinet Meeting News : अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठकState Cabinet Meeting News : अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक
राज्याचे अर्थसंकल्प अधिवेशन सध्या सुरू असून सोमवारी (ता.10) अर्थमंत्री अजित पवार मांडणार आहेत. याआधी अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. ही बैठक संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर होणार आहे.
Delhi News : राजधानीत 'महिला समृद्धी योजना' लागूदिल्लीतील भाजप सरकारने आर्थिक दुर्बल घटकातील महिलांसाठी महिला समृद्धी योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 2500 रुपयांची मदत सरकार महिलांना देणार आहेत. शनिवारी (ता.8) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत त्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी घेतला.
Sanjay Raut News : बाळासाहेबांच्या विचारांचे बुस्टर देत राहू : संजय राऊतठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना फुटीवरून भाष्य करताना ठाकरे गट फुटीनंतरही शिवसेनेत असणाऱ्या शिवसैनिकांना बाळासाहेबांच्या विचारांचे बुस्टर देत राहणार असल्याचे सांगितले आहे. तसेच यावेळी त्यांनी भाजपवर हल्लाबोल करताना, पाकव्याप्त काश्मिर भारतात घेण्यापासून सरकारला कोण रोखलं आहे. तुमच्याकडे सैनिक आहे. का घेत नाही, असा सवाल केला आहे.
Pune News : गौरव आहूजाचा मित्र भाग्येश ओसवाल यालाही अटकपुण्यात भर रस्त्यात अश्लिल कृत्य करणाऱ्या गौरव आहूजाला बेड्या पोलिसांनी ठोकल्या आहेत. त्याच्यापाठोपाठ आता पोलिसांनी त्याचा भाग्येश ओसवाला यालाही ताब्यात घेतलं आहे. येरवडा पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याची मेडिकल टेस्ट केली आहे. ज्यात अल्कोहोलचे प्रमाण आढळलं आहे.
Congress News : साताऱ्यात काँग्रेसला धक्का? उदयसिंह पाटील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवरराज्याचे माजी सहकार मंत्री स्व. विलासराव पाटील-उंडाळकर यांचे चिरंजीव उदयसिंह पाटील-उंडाळकर काँग्रेस सोडण्याची शक्यता वर्तवली जातेय. तर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील अशा चर्चांना उत आला आहे. यामुळे काँग्रेससह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना धक्का मानला जातोय.
Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख यांच्या हस्तेच्या निषेधार्थ बारामतीत मोर्चासरपंच संतोष देशमुख यांच्या हस्तेच्या निषेधार्थ बारामतीत आज (ता.9) सर्वधर्मीय निषेध मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे. हा सर्वधर्मीय मोर्चा काढण्यात येणार आहे. याचे आयोजन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले असून याची सुरूवात बारामतीतील कसबा येथून होणार आहे. तर शेवट बारामतीतील नगरपालिके समोर होणार आहे. या मोर्चात संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख आणि भाऊ धनंजय देशमुख हे उपस्थितीत असणार आहेत.
Ladki Bahini Yojana News : महायुती सरकारचा दे धक्का! यवतमाळ जिल्ह्यातील 27 हजार लाडक्या बहिणी अपात्रराज्यातील महायुती सरकारने लाडक्या बहिणींना दे धक्का करत अपात्र ठरवले आहेत. आता यवतमाळ जिल्ह्यातील 27 हजार लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या असून त्या कार, कर भरणारे आणि पती नोकरीवर असल्याच्या निकषांमुळे अपात्र ठरल्या आहेत.
Nitesh Rane News : औरंगजेबाजी कबरीचं काय होईल ते कळलेच : नितेश राणेराज्यात सुरू झालेल्या औरंगजेब वादावरून खासदार उदयनराजे यांनी औरंगजेबची कबरच उखडून टाका, अशी मागणी केली होती. यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी यावरून महायुती सरकारला डिवचले होते. तर उदयनराजे यांची मागणी असेल तर सरकारने निर्णय घ्यावा असे म्हटले होते. यानंतर आता मंत्री मंत्री नितेश राणेंनी औरंगजेब कबरीवरून मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी ही कबर महाराष्ट्रात किती काळ राहील हे येणाऱ्या काही दिवसात दिसेलच. आमचं सरकार योग्य वेळी निर्णय घेईल आणि ब्रेकिंग न्यूज मिळेल असे म्हटलं आहे.
Ladki Bahini Yojana Maharashtra News : लाडकी बहीण योजनेचा एकच हफ्ता जमाजागतिक महिला दिनाच्या औचित्यावर लाडकी बहीण योजनेचे दोन हफ्ते जमा केले जातील असे अश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले होते. पण लाडकी बहीण योजनेचा एकच हफ्ता जमा करण्यात आला आहे. यामुळे आता एकच खळबळ उडाली असून विरोधकांनी टीका करणे सुरू केले आहे.
Beed Crime News : रक्षकच बनला भक्षक! बीडमध्ये महिला दिनीच तरुणीवरीवर बलात्कार, पोलिसाने केला अत्याचारजागतिक महिला दिनीच बीड जिल्ह्यात तरुणीवर बलात्कार एका पोलिस कर्मचाऱ्याने केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे या कर्मचाऱ्याने तरूणीने आरडाओरड केल्यास चोरीचा खोटा गुन्हा दाखल करेन अशी धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. या नराधम पोलिसाचे नाव ठाणे अंमलदार उद्धव गडकर असे आहे. गडकरवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले. तर पीडितेला वैद्यकीय तपासणी करण्यासाठी पाठवण्यात आले आहे.