चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy 2025) च्या फायनलमध्ये भारताविरुद्ध (Ind vs Nz Final) टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतल्यानंतर कीवी ओपनर्सने 7 ओव्हरमध्ये 51 धावा केल्या. त्यानंतर टीम इंडियाची बॉडी लँग्वेजच बदलली आणि अनेक विश्लेषकांचे सूरही बदलले. पिच खेळण्यासाठी उत्तम होती. त्यामुळे न्यूझीलंड सहजपणे 300 च्या पार स्कोअर उभा करेल असं या विश्लेषकांचं म्हणणं होतं. पण त्याचवेळी वरुण चक्रवर्तीने विल यंगला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आणि त्यानंतर न्यूझीलंडच्या इनिंगमध्ये एक असा टर्निंग प्वाइंट आला, जो संपूर्ण सामन्याचा मोठा टर्निंग प्वाइंट बनला. हा टर्निंग प्वाइंट कुलदीप यादवच्या रूपात आला. कुलदीपने कीविंवर जबरदस्त प्रहार केला. त्यामुळे कीवींची बॅटिंग संपूर्णपणे ढासळली आणि ते अखेरपर्यंत सावरू शकले नाहीत. हा टर्निंग प्वाइंटच होता, कारण एक वेळ जेव्हा न्यूझीलंडचा स्कोअर मोठा दिसत होता. पण भारतीय गोलंदाजांनी 7 विकेट्स काढत न्यूझीलंडला 251 धावांवर रोखलं. हा टर्निंग प्वाइंट आला नसता, तर न्यूझीलंड संघ फायनलमध्ये मोठा स्कोअर बनवण्यात यशस्वी झाला असता.
जेव्हा 13 बॉलमध्ये दोन मोठ्या बॅट्समनला गोलंदाज एखाद्या सामन्यात आऊट करतो, तर ते सर्वात मोठा टर्निंग प्वाइंट मानला जातो. कुलदीप यादवने असंच काही केलं. पहिल्यांदा कुलदीपने 11व्या ओव्हरच्या पहिल्या गुगली बॉलवर रवींद्र रचिनची विकेट काढली. कीवी अजून सावरलेही नव्हते की दोन चेंडूनंतर कुलदीपने मागील सामन्यात शतक करणाऱ्या विलियमसनला आपल्याच बॉलवर टिपून न्यूझीलंडच्या ड्रेसिंग रूममध्ये खळबळ उडवली आणि करोडो भारतीयांना जल्लोष करायला लावला. विलियमसन आऊट झाल्यानंतर न्यूझीलंडचा खेळ ढासळला तो ढासळलाच.
फायनल सामन्यापूर्वी कुलदीपने चांगली गोलंदाजी केली होती, पण फक्त पाचच विकेट्स घेतल्या होत्या. पण जेव्हा टीम इंडियाला खरोखरचं गरज होती, तेव्हाच त्याने आपलं खरं सामर्थ्य दाखवलं. या लेफ्टी चाइनमैन बॉलरने न्यूझीलंडचे दोन मोठे विकेट्स घेत एकप्रकारे सामन्याचा कलच बदलला. असं म्हणता येईल की, कुलदीपसाठी संपूर्ण टूर्नामेंट एका बाजूला आणि फायनल एका बाजूला होती! टीम इंडियाच्या या धमाकेदार कामगिरीनंतर नेटकरीही सक्रिय झाले. गोलंदाजांनी आपलं काम पूर्ण केलं. आता फक्त शंभर टक्के विजय निश्चित करायचा आहे, अशा प्रतिक्रिया नेटकरी व्यक्त करत होते.