… आणि विराट कोहली मैदानातच नाचायला लागा, असं काय घडलं?; व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
GH News March 10, 2025 12:10 AM

आयसीसीच्या चॅम्पियन ट्रॉफीचा उत्साह आता शिगेला पोहोचला आहे. चॅम्पिय ट्रॉफीचा अंतिम सामना आज इंडिया आणि न्यूझीलंडच्या संघामध्ये दुबईत सुरू आहे. या सामन्यात आज टीम इंडियानं दमदार कामगिरी केली, न्यूझीलंडच्या टीमला अवघ्या 251 धावांवरच रोखलं. न्यूझीलंडने निर्धारीत पन्नास षटकांमध्ये सात गड्याच्या मोबदल्यात 251 धावा केल्या. भारताला आता विजयासाठी 252 धावा करायच्या आहेत. दरम्यान हा सामना सुरू असतानाच आता सामन्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली हा डान्स करताना दिसत आहे. कोहलीचा हा व्हिडीयो त्याच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे. या व्हिडीओवर लाईक आणि कमेंटचा पाऊस पडत आहे. वेगवेगळ्या सोशल मिडिया अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

लॅथम बाद होताच कोहलीचा डान्स

विराट कोहलीचा हा व्हायरल झालेला व्हिडीओ भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये सुरू असलेल्या आजच्या सामन्यामधील आहे. 24 वी ओव्हर सुरू असताना विराट कोहली मैदानात डान्स करताना पाहायला मिळाला. ही ओव्हर रविंद्र जडेजा टाकत होता, ओव्हरचा दुसरा बॉल फलंदाजी करत असलेल्या टॉम लॅथम याला कळाला नाही, आणि तो त्याच बॉलवर एलबीडब्ल्यू आऊट झाला.टॉम लॅथम आऊट झाल्यानंतर कोहलीला आनंद झाला. आनंदाच्या भरतामध्ये त्याने काही डान्सिंग स्टेप केल्या. त्याच्या चाहात्यांना हा व्हिडीओ खूपच आवडला आहे. या व्हिडीओवर लाईक आणि कमेंटचा पाऊस पडत आहे.

फायनल सामन्यात केवळ 14 च धावा केल्या

सध्या दुबईच्या मैदानावर भारत आणि न्यूझीलंड संघात चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलचा महामुकाबला सुरू आहे. या सामन्यामध्ये सर्वांनाच टॉम लॅथमकडून खूप अपेक्षा होत्या. मात्र फायनल सामन्यात त्याला केवळ 14 च धावा करता आल्या, त्याने तीस चेंडूचा सामना केला. त्याला रविंद्र जडेजाने बाद केलं. तो बाद होताच विराट कोहलीनं मैदानात डान्स केला. त्याचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. दरम्यान भारतानं या टूर्नामेंटमध्ये अजूनही एकही सामना गमावलेला नाहीये.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.