Ritika Sajdeh, India vs New Zealand Final: चॅम्पियन ट्रॉफ 2025 चा अंतिम सामना रविवारी खेळला जात होता. भारत आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी केली. न्यूझीलंडने भारतासमोर विजयासाठी 252 धावांचे लक्ष्य ठेवले. भारतीय संघाने 252 धावांचे लक्ष्याचा पाठलाग करताना चांगली सुरुवात केली. सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी धडाकेबाज खेळ सुरु केला होता. परंतु न्यूझीलंडकडून चौथे षटक सुरु असताना रोहित शर्माला थोडे अस्वस्थ वाटत होते. त्याला खोकलाही आला. त्यानंतर ड्रेसिंगरुममधून फिजिओ धावतच मैदानात आले. त्यावेळी स्टेडियमध्ये बसलेली रोहित शर्मा याची पत्नी रितिका सजदेव आणि मुलगी टेन्शनमध्ये आली.
फिजिओ मैदानात आले. त्यांनी रोहित शर्मा याच्याशी चर्चा केली. त्यानंतर सर्वकाही ठीक असल्याचे पाहिल्यावर पुन्हा स्टेडियमकडे परतले. मैदानात हा सर्व प्रकार सुरु असताना रितिका सजदेह याच्याकडे कॅमेरा गेला. ती आणि त्यांची मुलगी चिंताग्रस्त झाली होती. परंतु रोहित शर्मा फिजिओशी बोलल्यानंतर खेळ पुन्हा सुरु झाला. त्यानंतर कुठे रितिका सजदेह यांनी सुटकेचा निश्वास सोडला. परंतु त्या काही क्षणाचा त्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अंतिम सामन्यात टीम इंडियाला 252 धावांचे लक्ष्य मिळाले. त्याचा पाठलाग करताना रोहित आणि शुभमन गिल यांनी चांगली सुरुवात केली. या जोडीने 105 धावा 18.4 षटकांत काढल्या. 50 चेंडूत 31 धावा करत गिल बाद झाला. गिल याच्या जागी आलेल्या विराट कोहलीकडून मोठी अपेक्षा होती. दोन सामन्यांत जबरदस्त कामगिरी करणारा विराट आता मोठी खेळी करेल, अशी अपेक्षा होती. परंतु एका धावावर विराट बाद झाला. त्यानंतर आलेल्या श्रेयस याने रोहित याच्यासोबत धावफलक हालता ठेवला. रोहित शर्मा 76 धावांवर असताना बाद झाला. त्यामुळे बिनबाद 104 धावसंख्या टीम इंडियाची असताना तीन बाद 122 अशी धावसंख्या त्यावेळी झाली.
टीम इंडिया इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती.
न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : मिचेल सँटनर (कर्णधार), विल यंग, रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डॅरिल मिचेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, कायल जेमिसन, विल्यम ओरुर्के आणि नॅथन स्मिथ