50144
वैभववाडीत ठाकरे शिवसेनेला खिंडार
पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ९ ः तालुक्यात पालकमंत्री नीतेश राणे यांनी ठाकरे शिवसेनेला मोठा धक्का दिला. ठाकरे शिवसेनेचे युवा सेना चिटणीस स्वप्नील धुरी, सोनाळी सरपंच भीमराव भोसले, खांबाळे माजी उपसरपंच गणेश पवार यांच्यासह अनेक युवा कार्यकर्त्यांनी राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
पालकमंत्री राणे वैभववाडी दौऱ्यावर आले असता भाजप कार्यालयात हे पक्ष प्रवेश घेण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे, दिलीप रावराणे, नासीर काझी, भालचंद्र साठे, राजेंद्र राणे, संजय सावंत, रवींद्र रावराणे, रितेश सुतार, प्राची तावडे, श्रद्धा रावराणे, शारदा कांबळे, सीमा नानिवडेकर, स्नेहलता चोरगे आदी उपस्थित होते.
श्री. धुरी यांनी शुक्रवारी (ता. ७) आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी तिथवली सोसायटी संचालक जयराज हरियाण, संचालक चंद्रकांत धुरी, ग्रामपंचायत सदस्य चित्रा हरियाण, सायली धुरी, गणेश पवार, कोळपे जिल्हा परिषद युवा सेना विभागप्रमुख राजेश पवार, युवा सेना उपतालुकाप्रमुख सत्यवान सुतार, दिगशी शाखाप्रमुख देवेंद्र पाष्टे, युवासेना उपविभागप्रमुख जयेश पवार, नरेंद्र धुरी, सागर पवार, रवींद्र पाटील, राहुल धुरी यांच्यासह ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. सोनाळी सरपंच भीमराव भोसले यांच्या भाजप प्रवेशामुळे आणखी एक ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात आली आहे. तर खांबाळे माजी उपसरपंच गणेश पवार यांनी जयेश पवार, गणेश पवार, यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपा प्रवेश केला. त्यामुळे हा ठाकरे शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात असून मोठे खिंडार पडले आहे.