IND vs NZ Final Live: अरे, यार विराट कोहली दुसऱ्याच चेंडूवर OUT झाला; Anushka Sharma ने काय केले ते पाहा... Viral Video
esakal March 10, 2025 03:45 AM

Final IND vs NZ Live : रोहित शर्मा ( Rohit Sharma) व शुभमन गिल यांनी भारताला १०५ धावांची सलामी दिल्यानंतर टीम इंडिया सहज मॅच जिंकेल असे वाटतेय. पण, मोठ्या स्पर्धेचा मोठा खेळाडू विराट कोहली १ धाव करून माघारी परतल्याने रोहितवर दडपण आले आहे. मिचेल ब्रेसवेलच्या गोलंदाजीवर विराट बाद झाल्याने अनुष्का शर्मालाही ( ) आश्चर्य वाटले.

न्यूझीलंडने आयसीसी स्पर्धेच्या बाद फेरीत यापूर्वी टीम इंडियाला पराभूत केले आहे. पण, आज चित्र वेगळे दिसतेय. भारतीय संघ २००० साली चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये झालेल्या पराभवाचा वचपा काढायला मैदानावर उतरलेली दिसली. किवींना २५१ धावांवर रोखून फिरकीपटूंनी भारताची अर्धी लढाई जिंकली. वरुण चक्रवर्थी आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. डॅरील मिचेल ( ६३) व मिचेल ब्रेसवेलने ( ५३) धावांची खेळी करून किवींना सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली.

प्रत्युत्तरात, रोहित शर्माने नेहमीप्रमाणे आक्रमक सुरुवात केली. त्याने षटकार पाहण्यासारखे होते आणि स्टेडियम दणाणून गेले होते. शुभमन गिलसोबतच्या ४८ चेंडूंतील अर्धशतकी भागीदारीत रोहितच्या ३९ धावा होत्या. रोहितच्या खेळीतून २०२३ च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये झालेली जखम किती मनाला लागलेली ही समजत होते. त्यामुळे आज काही करून चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची संधी गमवायची नाही, हा रोहितचा निर्धार होता. त्याने ४१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि आयसीसी स्पर्धेच्या फायनलमध्ये ५०+ धावा करणारा तो सौरव गांगुली व महेंद्रसिंग धोनी यांच्यानंतर भारताचा तिसरा कर्णधार ठरला.

रोहित-शुभमन जोडीने १७ षटकांत भारताच्या १०० धावा फलकावर चढवल्या. ही दोघंच टीम इंडियाला विजय मिळवून देतील असे वाटत असताना मिचेल सँटनरने भागीदारी तोडली. ग्लेन फिलिप्सने आणखी एक अविश्वसनीय झेल घेतला. कव्हर् वर फिलिप्सने हवेत झेपावताना एका हातने झेल टिपला. गिल ५० चेंडूंत १ षटकारासह ३१ धावांवर बाद झाला.त्यानंतर आलेला विराट कोहली दुसऱ्याच चेंडूवर पायचीत झाला. मिचेल ब्रेसवेलने ही विकेट मिळवली आणि अनुष्का श्रमाने तोंडावर बोट ठेवला.

दरम्यान, रोहित मैदानावर उभा आहे आणि त्याला श्रेयस अय्यरची सोबत मिळतेय. भारताने २५ षटकांत २ बाद १२२ धावा केल्या होत्या. पण पुढच्याच षटकात रचिन रवींद्रच्या गोलंदाजीवर पुढे जाऊन फटका मारण्याच्या प्रयत्नात रोहित बाद झाला. तो ८३ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ७६ धावांवर माघारी परतला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.