पुण्यातील रस्त्यावर अश्लील कृत्य करणाऱ्या गौरव आहुजा आणि त्याचा मित्र भाग्येश ओसवाल यांना न्यायालयाने एका दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी आज दोघांनाही न्यायालयात हजर केले होते. यावेळी दोघांच्या वकिलांनी युक्तीवाद केला. यावेळी सरकारी वकिलांनी सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. मात्र, न्यायालयाने ही मागणी अमान्य करत १ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.