गाडीतील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एका व्यक्तीची प्रकृती गंभीर असून, त्याला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे.
बंगळूर : चित्रदुर्ग जिल्ह्यातील सिबरा गावाजवळ एका वेगाने येणाऱ्या ट्रक आणि मोटारीमध्ये रविवारी सकाळी भीषण (Car-Truck Accident) झाला आणि त्यात पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये बंगळूर येथील निवृत्त बीएमटीसी कर्मचारी शांत मूर्ती (वय ६०), विद्यारण्यपूर येथील रुद्रस्वामी (५२) आणि बंगळूर उत्तर येथील इराणा लेआउट येथील मल्लिकार्जुन (५०) यांचा समावेश आहे.
इतर दोघांची ओळख अद्याप पटलेली नाही. गाडीत रेणुका यल्लम्मा मंदिराचा प्रसाद सापडला. ते गाडीने सौंदत्ती येथील रेणुका यल्लम्मा देवस्थानाला (Saundatti Yellamma Temple) गेले होते आणि परत येताना हा अपघात झाल्याचे समजते.
त्यांच्या मोटारीने तमिळनाडूची नंबर प्लेट असलेल्या ट्रकला मागून धडक दिली. त्यामुळे गाडीतील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एका व्यक्तीची प्रकृती गंभीर असून, त्याला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे. चित्रदुर्ग ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ते पुढील तपास करत आहेत.