भारताने ९ मार्च रोजी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने हे विजेतेपद जिंकले आहे.
भारताचे दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मासाठी २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफी हे चौथे आयसीसी विजेतेपद ठरले आहे.
त्यामुळे भारतासाठी ४ आयसीसी स्पर्धा जिंकणारे ते एकमेव खेळाडू ठरले आहेत. त्यांच्याशिवाय कोणत्याच भारतीय खेळाडूला ४ आयसीसी स्पर्धांचे विजेतेपद जिंकता आलेलं नाही.
विराट कोहलीने २०११ वनडे वर्ल्ड कप, २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी, २०२४ टी२० वर्ल्ड कप आणि २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफी या चार आयसीसी स्पर्धा जिंकल्यात.
रोहितने २००७ टी२० वर्ल्ड कप, २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी, २०२४ टी२० वर्ल्ड कप आणि २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफी हे चार आयसीसी स्पर्धा जिंकल्या.
महत्त्वाचे म्हणजे रोहितने २०२४ टी२० वर्ल्ड कप आणि २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफी या आयसीसी स्पर्धा कर्णधार म्हणून जिंकल्या आहेत.