नवी दिल्ली : साहित्य अकादमीने २०२४ साठीच्या अनुवाद पुरस्कारांची घोषणा असून, मराठी भाषेसाठी हा सन्मान सुदर्शन आठवले यांना जाहीर करण्यात आला आहे. त्यांनी गुरुचरण दास लिखित इंग्रजीतील ‘द डिफिकल्ट ऑफ बीईंग गुड’ या साहित्यिक समीक्षेचा मराठी अनुवाद केला आहे.
साहित्य अकादमीच्या कार्यकारी मंडळाची बैठक रवींद्र भवन येथे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यामध्ये २०२४ साठीच्या साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कारांसाठी २१ भाषांतील पुस्तकांची निवड करण्यात आली.
साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कारासाठीच्या मराठी भाषेसाठी परीक्षक मंडळात निशिकांत ठाकूर, प्राची गुजरापध्याय-खंडेपारकर आणि निशा संजय डांगे यांचा समावेश होता. या पुरस्कारांतर्गत पन्नास हजार रुपये रोख रक्कम आणि ताम्र प्रशस्तीपत्र प्रदान केले जाते. हा सन्मान एका विशेष समारंभात दिला जातो.