चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूचा गोल्डन बॅटने सन्मान केला जातो. आत्तापर्यंत ९ वेळा ही स्पर्धा झाली असून प्रत्येक स्पर्धेत कोणाला हा मान मिळालाय पाहा.
चॅम्पियन्स ट्रॉफी १९९८ स्पर्धेत वेस्ट इंडिजचे फिलो वेलास गोल्डन बॅटचे मानकरी ठरले होते. त्यांनी ३ सामन्यात २२१ धावा केल्या होत्या.
चॅम्पियन्स ट्रॉफी २००० स्पर्धेत भारताचा सौरव गांगुली गोल्डन बॅटचा मानकरी होता. त्याने ३४८ धावा या स्पर्धेत केल्या होत्या.
चॅम्पियन्स ट्रॉफी २००२ स्पर्धेत भारताचा स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग गोल्डन बॅटचा मानकरी होता. त्याने २७१ धावा केल्या होत्या.
चॅम्पियन्स ट्रॉफी २००४ स्पर्धेत इंग्लंडच्या मार्कस स्ट्रेस्कोथिकने गोल्डन बॅट जिंकली होती. त्याने ४ सामन्यात २६१ धावा केल्या होत्या.
चॅम्पियन्स ट्रॉफी २००६ स्पर्धेत वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने गोल्डन बॅट जिंकली होती. त्याने ४७४ धावा केल्या होत्या.
चॅम्पियन्स ट्रॉफी २००९ स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग गोल्डन बॅटचा विजेता ठरला होता. त्याने २८८ धावा केल्या होत्या.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०१३ स्पर्धेत भारताचा शिखर धवन गोल्डन बॅट विजेता होता. त्याने ३६३ धावा ठोकल्या होत्या.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ स्पर्धेत देखील शिखर धवननेच गोल्डन बॅट जिंकली होती. दोनदा हा मान मिळवणारा तो पहिलाच खेळाडू आहे. २०१७ च्या स्पर्धेत त्याने ३३८ धावा केल्या होत्या.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत रचिन रवींद्र गोल्डन बॅटचा मानकरी ठरला आहे. त्याने ४ सामन्यात २६३ धावा केल्या आहेत.