'खतरों के खिलाडी' या रिअॅलिटी शोची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. या शोमधील स्टंट पाहून डोळे भिरभिरतात. आत या शोचा 15 वा सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहत्यांना या सीझनमध्ये कोण कोण सेलिब्रिटी पाहायला मिळणार हे जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे. आतापर्यंत या धमाकेदार शोचे होस्टिंग रोहित शेट्टीने (Rohit Shetty) केले आहे. मात्र यंदाचे सीझन कोण होस्ट करणार याचा अद्याप खुलासा झाला नाही आहे.
अनेक सेलिब्रिटींना शोसाठी विचारण्यात येत आहे. आता सोशल मीडियावर बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्रीला 'खतरों के 15' साठी (khatron ke Khiladi 15) विचारण्यात आल्याची चर्चा रंगली आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून इमरान हाश्मीची हिरोईन शेरावत (Mallika Sherawat ) आहे. इमरान हाश्मी आणि मल्लिका शेरावतने अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. यांच्या केमिस्ट्रीचे चाहते दिवाने आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, 'खतरों के खिलाडी 15'साठी अभिनेत्री मल्लिका शेरावतला विचारण्यात आले आहे. मात्र अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
सध्या सोशल मीडियावर 'खतरों के खिलाडी 15' सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची यादीत व्हायरल होत आहे. यात कोणाची नावे आहेत , जाणून घेऊयात.
यादव
सिद्धार्थ निगम
चुम दरांग
अभिषेक मल्हान
ईशा सिंह
गौतम गुलाटी
मनीषा रानी
ओरी
गुलकी जोशी
शगुन पांडे
रजत दलाल
भाविका शर्मा
'ख्वाहिश' चित्रपटातून मल्लिका शेरावतने खऱ्या अर्थाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मल्लिका शेरावत 'मर्डर' चित्रपटामुळे रातोरात स्टार झाली. 'मर्डर'मध्ये मल्लिका शेरावतने इमरान हाश्मीसोबत काम केले आहे. या चित्रपटात तिने बोल्ड सीन आणि किसिंग सीन केले आहेत. यानंतर तिने अनेक चित्रपटात काम केले आहे. यामध्ये बचके रहना रे बाबा, वेलकम, प्यार के साइड इफेक्ट्स, शादी से पहले यांचा समावेश आहे.