Chhaava Box Office Collection: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या धामधुमीतही 'छावा'नं मारली बाजी, ६०० कोटींच्या दिशेने यशस्वी घोडदौड सुरू
Saam TV March 10, 2025 03:45 PM

लक्ष्मण उतेकर यांनी या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा दाखवण्यात आली आहे. 'छावा' (Chhaava ) चित्रपट 14 फेब्रुवारीला रिलीज झाला आहे. 'छावा' चित्रपटात विकी कौशल (Vicky Kaushal) छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. 'छावा' हा विकी कौशलच्या आयुष्यातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 'छावा' तब्बल 130 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवला आहे.

'छावा' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 24
  • पहिला दिवस 33.1 कोटी रुपये

  • दूसरा दिवस-39.3 कोटी रुपये

  • तिसरा दिवस 48.5 कोटी रुपये

  • चौथा दिवस 24 कोटी रुपये

  • पाचवा दिवस-24.50 कोटी रुपये

  • सहावा दिवस-32 कोटी रुपये

  • सातवा दिवस 21.5 कोटी रुपनों

  • आठवा दिवस 23 कोटी रुपये

  • नववा दिवस 45 कोटी रुपये

  • यहावा दिक्स 40 कोटी रुपये

  • अकरावा दिवस-19.10 कोटी रुपये

  • बारावा दिवस - 18.5 कोटी रुपये

  • तेरावा दिवस-21.75 कोटी रुपये

  • चौदावा दिवस- 12 कोटी रुपये

  • पंधरावा दिवस 400 कोटीचा टप्पा पार

  • सीलावा दिवस-21 कोटी रुपये

  • सतरावा दिवस-25 कोटी रुपये

  • अठरावा दिवस-8.50 कोटी रुपये

  • एकोणिसावा दिवस -5.50 कोटी रुपये

  • विसावा दिवस-5.75 कोटी रुपये

  • एकवीसावा दिवस-5.53 कोटी रुपये

  • बाविसावा दिवस - 6.30 कोटी रुपये

  • तेवीसावा दिवस - 16.5 कोटी रुपये

  • चोवीसावा दिवस - 11.5 कोटी रुपये

  • एकूण - 520.55 कोटी रुपये

'छावा'ने रिलीजच्या पहिल्या दिवसापासून बंपर कमाई केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'छावा'ने पहिल्या आठवड्यात 225.8 कोटी, दुसऱ्या आठवड्यात 186.18 कोटी, तिसऱ्या आठवड्यात 84.94 कमावले. 'छावा' चित्रपटाने 24 व्या दिवशी 11.5 कोटी रुपयांचा केला आहे. आतापर्यंत 'छावा'ने 520.55 कोटी रुपये कमावले आहे. आता 'छावा' चित्रपटाची ६०० कोटींच्या दिशेने यशस्वी घोडदौड सुरू झाली आहे.

'छावा' चित्रपटात महाराणी येसूबाईची भूमिकेत दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) तर औरंगजेबाची भूमिका अभिनेता अक्षय खन्नाने (Akshaye Khanna) साकारली आहे. तसेच चित्रपटात अनेक मराठी कलाकारही झळकले आहे. 'छावा' नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. 'छावा'ने अनेक मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड ब्रेक केले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.