वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील तिसऱ्या हंगामातील (WPL 2025) 19 व्या सामन्याला मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांची यंदा आमनेसामने येण्याची तिसरी वेळ आहे. मुंबईने याआधी 18 फेब्रुवारीला झालेल्या सामन्यात गुजरातवर 5 विकेट्सने विजय मिळवला होता. त्यामुळे गुजरातकडे या मोहितेमील शेवटच्या साखळी फेरीत विजय मिळवून मुंबईविरुद्ध पराभवाची परतफेड करण्याची संधी आहे. तर मुंबई गुजरातला पुन्हा पराभूत करण्यासाठी सज्ज आहे. हरमनप्रीत कौर मुंबईचं नेतृत्व करणार आहे. तर ॲशले गार्डनर हीच्याकडे गुजरात जायंट्सच्या नेतृत्वाची धुरा आहे. या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार? हे जाणून घेऊयात.
मुंबई विरुद्ध गुजरात यांच्यातील सामना सोमवारी 10 मार्च रोजी खेळवण्यात येणार आहे.
मुंबई विरुद्ध गुजरात यांच्यातील सामना हा ब्रेबॉर्न स्टेडियम येथे होणार आहे.
मुंबई विरुद्ध गुजरात सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.
मुंबई विरुद्ध गुजरात सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
मुंबई विरुद्ध गुजरात सामना मोबाईलवर जिओ हॉटस्टार या एपवर लाईव्ह पाहायला मिळेल.
मुंबई इंडियन्स वू्मन्स टीम : हरमनप्रीत कौर (कर्णधार), हेली मॅथ्यूज, अमेलिया केर, नॅट सायव्हर-ब्रंट, अमनजोत कौर, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), सजीवन सजना, जी कमलिनी, संस्कृती गुप्ता, शबनीम इस्माईल, पारुनिका सिसोदिया, अमनदीप कौर, अक्षिता माहेश्वरी, जिंतिमणी कलिता, सायका इशाक, कीर्थना बालकृष्णन, नादिन डी क्लर्क आणि क्लो ट्रायॉन.
गुजरात जायंट्स वूमन्स टीम : ॲशले गार्डनर (कर्णधार), बेथ मुनी (विकेटकीपर), दयालन हेमलता, हरलीन देओल, डिआंड्रा डॉटिन, फोबी लिचफिल्ड, काशवी गौतम, भारती फुलमाली, मेघना सिंग, तनुजा कंवर, प्रिया मिश्रा, लॉरा वोल्वार्ड, डॅनियल गिब्सन, सिमरन शेख, मन्नत कश्यप, शबनम एमडी शकील, प्रकाशिका नाईक आणि सायली सातघरे.