पिंपरी, ता. १० : ‘‘राज्यात सध्या कोणीही वादग्रस्त आणि अवमानास्पद वक्तव्य करत आहेत. त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भय्याजी जोशी यांनी मराठी भाषेचा अपमान होईल असे वक्तव्य घाटकोपर येथे केले,’’ अशी टीका करत शिवसेना-ठाकरे पक्षाच्यावतीने पिंपरी येथे नुकतेच आंदोलन करण्यात आले.
यावेळी पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख संजोग वाघेरे पाटील यांच्या नेतृत्वात माजी आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, शहर संघटिका अनिता तुतारे, युवा सेना शहराध्यक्ष चेतन पवार, हाजी मणियार, हरेश नखाते, तुषार नवले, मीनल यादव, विशाल नाचपल्ले आदी उपस्थित होते.
फोटो : PNE25U95993