Maharashtra Budget 2025: आज राज्याचे अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प विधानसभेत मांडणार आहेत. यंदा अकराव्यांदा वेळा अजित पवार अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी छत्रपतींसमोर नतमस्तक झाले . संपूर्ण राज्याचे महायुतीच्या बजेटकडे लक्ष लागले आहे. अशातच अर्थमंत्री अजित पवार यांनी घातलेल्या ग्रे जॅकेटने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
अजित पवार यांनी ग्रे रंगाचे जॅकेट घातले आहे. तसेच त्यांनी पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि पँट घातला आहे. यंदा त्यांचा लूक नवा असून सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्यांच्या हातात ब्राऊन रंगाची सुटकेस आहे.
सरकार राबवत असलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत राज्याची अर्थव्यवस्था कमकुवत झाल्याचे बोलले जात होते. त्यामुळे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार या योजनेत वाढ करणार की योजनेची रक्कम तीच ठेवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा देखील आहे. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कोणत्या घोषणा केल्या जाणार याकडेही लक्ष असणार आहे.
महाराष्ट्राच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेमुळे राज्याची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक असल्याचे सांगितले जाते. ही परिस्थिती लक्षात घेऊन निवडणुकीदरम्यान दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी सरकार काय पावले उचलते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
या अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांना खूप अपेक्षा आहेत. या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेच्या महिला लाभार्थ्यांना 2100 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली जाईल का? हे पाहणे महत्त्वाचे आहे. अजितदादांच्या अर्थसंकल्पावर शेतकरी, उद्योगपती आणि व्यापारीही लक्ष ठेवून आहेत.
विशेष म्हणजे अजित पवारांचा हा 11वा असणार आहे. माजी अर्थमंत्री शेषराव वानखेडे यांच्यानंतर सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा मान अजित पवारांना मिळणार आहे. शेषराव वानखेडे यांनी 13 वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यानंतर जयंत पाटील (10 वेळा) आणि सुशीलकुमार शिंदे (9 वेळा) यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे.