
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा 4 विकेट्सने पराभव करून विजेतेपद पटकावले. या सामन्यात टीम इंडियाच्या विजयाचा हिरो रोहित शर्मा होता. त्याने अंतिम सामन्यात 83 चेंडूत 76 धावांची खेळी केली. दरम्यान, टीम इंडियाला चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता बनवल्यानंतर रोहित शर्मा मुंबईत परतला आहे. यादरम्यान रोहितच्या स्वागतासाठी विमानतळाबाहेर चाहत्यांची गर्दी जमली होती. विमानतळाबाहेर आल्यानंतर रोहितने चाहत्यांचे त्यांच्या प्रेमाबद्दल आभार मानले.
मुंबई इंडियन्सने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रोहित विमानतळाबाहेर पडताना दिसत आहे. यावेळी चाहत्यांची मोठी गर्दी तिथे होती. रोहित बाहेर येताच सर्वांनी त्याचे नाव घेऊन जंगी स्वागत केले.