वृत्तपत्राच्या पोशाखात ‘रॅम्प वॉक’
Marathi March 11, 2025 10:24 AM

नागपूर महानगरपालिकेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने जागतिक महिला दिनी महिला उद्योजिका मेळावा घेण्यात आला. यामध्ये  ‘फॅशन शो’चे आयोजन करण्यात आले. या फॅशन शोमध्ये वृत्तपत्रापासून तयार केलेली वस्त्रs परिधान करून तरुण तरुणींनी ‘रॅम्प वॉक’ केला. टाकाऊ वस्तूंमधून कलात्मकतेचा संदेश देणाऱ्या या रॅम्प वॉकला प्रेक्षकांनी चांगलीच दाद दिली. नागपूर महानगरपालिकेच्या स्वच्छ भारत मिशन आयईसी टीमने  पुढाकार घेऊन जुन्या वर्तमानपत्रांपासून सुंदर पोशाख तयार केले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.