पाकिस्तानाच्या बलूचिस्तानमध्ये मंगळवारी एक ट्रेन हायजॅक (Pakistan Train Hijack) करण्यात आली. जाफर एक्सप्रेस कोटाहून पेशावरला जात असताना बॉम्बने ट्रेन उडवण्यात आली. त्यामुळे ट्रेन भुयारात थांबली. हल्लेखोरांनी आधी बॉम्ब फेकले त्यानंतर या ट्रेनवर ताबा मिळवला. बलूच लिबरेशन आर्मी (BLA) नावाच्या संघटनेने ही ट्रेन हायजॅक केली आहे. तसं पाहता ट्रेन हायजॅकची घटना अत्यंत दुर्मीळ आहे. नेहमी विमान अपहरणाच्या घटना आपण ऐकल्या आहेत. 1931मध्ये पहिल्यांदा प्लेन हायजॅक करण्यात आले होते. त्यानंतर आतापर्यंत 1000हून अधिक प्लेन हायजॅक करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. पण एखाद्या ट्रेनला हायजॅक करण्याची घटनाच धक्कादायक आणि आश्चर्यकारक आहे. रेल्वेचा इतिहास 200 वर्ष जुना असून यात ट्रेन हायजॅक करण्याच्या घटना अत्यंत कमी आहेत. ट्रेन हायजॅक करणं का अशक्य आहे? त्यावरच टाकलेला हा प्रकाश.
पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये दहशतवाद्यांनी मंगळवार दिनांक 11 मार्च रोजी कोटाहून पेशावरला जाणारी जाफर एक्सप्रेस ट्रेनला बोलनमध्ये हायजॅक करण्यात आलं. या रेल्वेतून 500 प्रवासी प्रवास करत होते. त्यात महिला आणि मुलांची संख्या सर्वाधिक होती. त्यामुळे संपूर्ण पाकिस्तानातच नव्हे तर जगभर खळबळ उडाली. पाकिस्तानच्या सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये यावेळी झालेल्या चकमकीत 16 दहशतवादी मारले गेले आहेत. तर अनेक दहशतवादी जखमी झाले आहेत. आमच्याकडून जे ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे, त्यामुळे दहशतवाद्यांचं मोठं नुकसान झालं आहे, असा दावा पाकिस्तानी सैन्याने केला आहे. तर पाकिस्तानची सैना बंदीवानांबाबतची काहीच माहिती देत नाही, असं पीडितांचं म्हणणं आहे.
जाफर एक्सप्रेस कोटाहून पेशावरला जात होती. बलोनच्या डोंगरातील टनेलमधून ट्रेन जात असताना 8 शस्त्र अतिरेक्यांनी ट्रेनवर हल्ला चढवला. डोंगराळ भाग असल्याने बलोनमध्ये नेटवर्कचा प्रचंड प्रॉब्लेम आहे. त्यामुळे ट्रेन चालक आणि रेल्वेत अडकलेल्या प्रवाशांशी संपर्क होत नव्हता.
या हल्ल्याची जबाबदारी बलोच लिबरेशन आर्मीने घेतली आहे. बीएलएला पाकिस्तानपासून बलूचिस्तान वेगळं करायचं आहे. त्यामुळे त्यांचे हे हल्ले सुरू आहेत. यापूर्वीही बीएलएने अनेक वाहनांवर हल्ले केले होते. यापूर्वी नोव्हेंबरमध्ये कोटा रेल्वे स्थानकावर झालेल्या स्फोटात कमीत कमी 26 लोक ठार झाले होते. मृतांमध्ये महिला आणि लहान बालकांचाही समावेश होता. तर 40 हून अधिक लोक जखमी झाले होते.
या ट्रेनमध्ये एकूण 500 प्रवासी होते. त्यात पाकिस्तानी सैन्याचे 140 जवान होते. या सर्वांना दहशतवाद्यांनी बंदी बनवलं आहे. त्यामुळे पाकिस्तानने एअर स्ट्राईक करून अतिरेक्यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, आमच्यावर हवाई हल्ला झाला तर सर्वच्या सर्व 140 जवानांचा खात्मा केला जाईल, अशी धमकीच या अतिरेक्यांनी पाकिस्तांनी सरकारला दिला आहे. पाकिस्तानी सैन्यावर बलोच अतिरेक्यांनी केलेला आजवरचा हा सर्वात मोठा हल्ला आहे.
रेल्वे ट्रॅक उडवून जाफर एक्सप्रेस रोखण्यात आली. त्यानंतर ट्रेनला टनेलमध्ये नेण्यात आलं. ट्रेनमध्ये पाकिस्तानी सेना, पोलीस, दहशतवाद विरोधी पथक आणि इंटर सर्व्हिसेज इंटेलिजन्सचे अधिकारी, कर्मचारी होते. सर्वजण सुट्ट्यांसाठी पंजाबला जात होते. बलोचच्या अतिरेक्यांनी त्यांना टार्गेट करून बंदी बनवलं. बीएलएचा अतिरेकी ग्रुप असलेल्या मजीद ब्रिगेडने हे ऑपरेशन केलं आहे.
काही दिवसांपूर्वी बलोच गटाने पाकिस्तान आणि चीनवर नवीन हल्ला करण्याची घोषणा केली होती. बलोचच्या अतिरेक्यांनी नुकतेच सिंधी विघटनवाद्यांसोबतचा युद्धाभ्यास संपवला होता. आता पाकिस्तानी सैन्याच्या विरोधात हा विद्रोही ग्रुप एकत्रित आला आहे. सिंधी आणि बलोच संघटनांनी एकत्र येऊन पाकिस्तानच्या सीपीईसी प्रकल्पाला मोठा धोका निर्माण केला आहे.
गेल्या महिन्यात बीआरएएस म्हमजे बलोच राजी आजोई संगरची एक बैठक झाली होती. या बैठकीला बलोच लिबरेशन आर्मी, बलूचिस्तान लिबरेशन फ्रंट, बलोच रिपब्लिकन गार्ड्स, सिंधी लिबरेशन ऑर्गनायजेशन, सिंधू देश रिव्होल्यूशनरी आर्मीचे कमांडर सहभागी झाले होते. या बैठकीत पाकिस्तानच्या विरोधात मोठं ऑपरेशन हाती घेण्याचा प्रस्ताव ठेवण्यता आला होता. या बैठकीनंतर काही दिवसातच पाकिस्तानातील ट्रेन हायजॅक करून अतिरेक्यांनी त्यांचा हेतू स्पष्ट केला आहे. त्यामुळे पाकिस्तानातील शहबाज सरकार संकटात सापडलं आहे.
20व्या शतकाच्या मध्यापासूनच प्लेन हायजॅक करणं नेहमी गंभीर मानलं गेलं आहे. सुरुवातीच्या काळात राजकीय कारणास्तव प्लेन हायजॅक केलं जायचं. नंतर खंडणी, दहशतवाद आणि गुन्हेगारी कृत्याच्या उद्देशाने विमान हायजॅक केलं जाऊ लागलं. त्यातही 9/11चा दहशतवादी हल्ला सर्वात भयंकर होता. 2001मध्ये अल कायदाने चार विमान हायजॅक करून न्यूयॉर्कच्या वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि पेंटागनवर हल्ला केला होता. त्यात सुमारे तीन हजार लोक मारले गेले होते.
1948पासून आतापर्यंत एक हजाराहून अधिक प्लेन हायजॅक झाले आहेत. केवळ 1968 ते 1972 दरम्यान 130 हून अधिक हायजॅकिंग झाल्या आहेत. 9/11नंतर सुरक्षा अधिक कडक करण्यात आली. त्यामुळे विमान हायजॅक करण्याच्या घटना घटल्या. पण असं असलं तरी प्लेन हायजॅकचा धोका काही टळलेला नाही.
प्लेनच्या तुलनेत ट्रेन हायजॅकच्या घटना अत्यंत कमी आहेत. कारण ट्रेन हायजॅकचं ऑपरेशन अधिक कठिण आणि जटील असतं. ट्रेनला ताब्यात घेणं इतकं सोपं नसतं. त्यामुळेच दहशतवादी ट्रेनला हायजॅक करण्याऐवजी ट्रेनवर बॉम्बचा हल्ला करण्याचे षडयंत्र रचत असतात.
ट्रेनला कंट्रोल करणं कठिण असतं. प्लेनच्या कॉकपिटवर कब्जा केल्यावर संपूर्ण विमान कंट्रोलमध्ये येतं. पण ट्रेनच्या बाबतीत असं होत नाही.
इंजितन, डब्बे, सिग्नल सिस्टिम वेगवेगळ्या प्रकारे ऑपरेट होतात. ट्रेनच्या मोटरमनला जबरदस्ती केली तरी रेल्वे कंट्रोल रुममधून ट्रॅकची सिस्टिम बंद केली जाऊ शकते.
ट्रेन थांबवता येऊ शकते. रेल्वे नेटवर्कमध्ये आपात्कालीन ब्रेक सिस्टीम असते. ती खेचल्यावर ट्रेन तिथेच थांबते. रेल्वे कंट्रोल रुम कोणत्याही वेळी कोणतीही ट्रेन रोखू शकतो. ट्रेन थांबताच सेक्युरिटी टीम घटनास्थळी पोहोचते. तर प्लेनला जमिनीवरून रोखणं अशक्य असतं.
प्लेनमध्ये जागा कमी असते. प्रवासी आत बंद असतात. त्यामुळे हायजॅकर्स विमानाला कंट्रोल करू शकतात. तर ट्रेनमध्ये प्रवाश्यांना पळून जाण्याच्या बऱ्याच संधी असतात. ट्रेन मोठी असते. एवढी महाकाय ट्रेन हायजॅक करणं कठिण असतं.
ट्रेन हायजॅक करण्याच्या प्रयत्नात जर चुकीचा सिग्नल दिला तर संपूर्ण ट्रेन पटरीवरून उतरू शकते. त्यामुळे स्वत: हाजजॅकर्सचं नुकसान होऊ शकतं.
1976 : साऊथ मोलुक्कनच्या विघटनावाद्यांनी नेदरलँडमध्ये एक ट्रेन हायजॅक केली होती. त्यानंतर त्यांनी 20 दिवस प्रवाशांना बंदी बनवलं होतं. सरकारने चर्चा करून या प्रकरणातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी सैन्याला ऑपरेशन हाती घ्यावं लागलं.
1986 : पोलंडमध्ये एका व्यक्तीने AK-47च्या बळावर ट्रेनवर ताबा मिळवला होता. त्याने बर्लिनच्या दिशेने ट्रेन नेण्याची डिमांड केली होती. पण सेक्युरिटी फोर्सने त्याच्या लगेचच मुसक्या आवळल्या होत्या.
1995 : चेचन्याच्या दहशतवाद्यांनी रशियात एक ट्रेन हायजॅक केली होती. रशियावर दबाव टाकण्याचा त्याचा यामागे हेतू होता.