मॉरीशसच नव्हे…तर पीएम मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत या देशांसाठी देखील मजबूत ढाल बनला
GH News March 12, 2025 06:13 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखील भारत एक मजबूत राष्ट्र म्हणून पुढे येत आहे. मॉरीशस दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांनी मॉरीशस एक सहकारी देशच नाही. तर आमच्यासाठी एक कुटुंब आहे. मॉरीशस भारताच्या सागरी व्हीजनच्या केंद्र स्थानी आहे. जेव्हा मॉरीशस प्रगती करतो तेव्हा सर्वात आधी भारताला आनंद होतो. भारताने केवळ मॉरीशसलाच नाही तर अन्य अनेक देशांना देखील मदत केली आहे. केवळ मॉरीशसच नाही तर पीएम मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत या देशांसाठी देखील संरक्षक ढाल बनला आहे.

मॉरीशसच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेद्र मोदी यांचा आज बुधवारी मॉरीशस दौऱ्याचा आज ( बुधवारी )  दुसरा दिवस आहे. भारताचा दृष्टीकोण सशर्त मदत करण्याऐवजी सन्मान, स्थैर्य आणि क्षमता निर्माण करण्यावर केंद्रीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगात एक मजबूत भागीदार म्हणून भारताच्या भूमिकेवर जोर दिला आहे, ज्यामुळे जगभरात पायाभूत व्यवस्था, आरोग्य सेवा, शिक्षण आणि कनेक्टीव्हीटी योजनांचे समर्थन केले आहे.

मॉरीशसमध्ये सिव्हील सर्व्हीस कॉलेज आणि एरिया हेल्थ सेंटरचे उद्घाटन झाले.या योजना मॉरीशसची प्रशासकीय आणि आरोग्य सेवा क्षमतांना मजबूत करण्यासाठी आणि दीर्घकालीन विकास आणि क्षमता निर्मितीला चालना देण्यासाठी भारताच्या प्रयत्नांना दर्शविते. दोन्हीही योजना भारताच्या अनुदान मदतीतून उभ्या राहील्या आहेत. मॉरीशसमध्ये एक आणखी मैलाचा दगड ठरतील. मॉरीशस केवळ आपला सहकारी देशच नाही तर आमच्यासाठी कुटुंब आहे.भारतासाठी मॉरीशस एक सागर व्हीजनातील केंद्र स्थानी असलेला देश आहे.जेव्हा मॉरीशस एक समृद्ध देश होतो तेव्हा भारताल सर्वात आधी आनंद होतो. मारीशस भारतासाठीच नाही तर अनेक देशांसाठी असे सहकार्य केले आहे.

भारत या देशांसाठी बनला ढाल-

१ – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने भूतानमध्ये पेमा वांगचुक मदर एण्ड चाईल्ड रुग्णालय बनविले आहे. ज्याचा पहिला टप्पा साल २०१९ मध्ये तर दुसरा टप्पा साल २०२४ मध्ये पूर्ण झाला आहे. गेल्यावर्षी मोदींनी त्याचे उद्घाटन केले होते. साल २०२३ मध्ये पीएम नरेंद्र मोदी यांनी बांग्लादेशच्या तत्कालिन पंतप्रधान शेख हसीना यांच्या सोबत संयुक्त रुपात पत्रकार परिषद घेऊन तीन भारतीय सहाय्यता मिळाल्या विकास योजनांचा रुजवात केली. यात अखौरा-अगरतला क्रॉस-बॉर्डर रेल लिंक, खुलना-मोंगला पोर्ट रेल्वे लाईन आणि बांग्लादेशातील रामपाल येथे मैत्री सुपर थर्मल पॉवर प्लांटच्या युनिट-|| चे उद्घाटन केले होते.

२- साल 2022 मध्ये पीएम नरेंद्र मोदी यांनी भारत आणि नेपाळमधील पहिल्या ब्रॉड गेज मार्ग जयनगर-कुर्था रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला होता. हा मार्ग भारताच्या अनुदानातून तयार होत आहे. २०२१ रोजी पंतप्रधान मोदी आणि सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष रामकलावन यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सींगद्वारे सेशेल्सच्या व्हीक्टोरियातील मॅजिस्ट्रेट कोर्टाच्या इमारतीचे उदघाटन केले होते. हा देशातील पहिला भारतीय मदतीने तयार होणारी पायाभूत सुविधा योजना होती, ज्यास ३५ लाख डॉलरच्या भारतीय मदतीने तयार केली होती.

३ – साल २०२० मध्ये पीएम मोदी आणि मॉरीशसचे पंतप्रधान जगन्नाथ यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मॉरीशसच्या नव्या सुप्रीप कोर्टाच्या इमारतीचे संयुक्त रुपाने उद्घाटन केले होते. तसेच साल २०१९मध्ये दोन्ही नेत्यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मॉरीशसमध्ये मेट्रो एक्सप्रेस योजना आणि नव्या ईएनटी हॉस्पीटलचे संयुक्त रुपाने उदघाटन केले होते.

४ – 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन अफगान राष्ट्राध्यक्षांनी अफगान-भारत मैत्रीच्या कालव्याचे उदघाटन केले होते. त्यास , पश्चिम अफगानिस्तानात सलमा कालवा म्हणून ओळखले जाते. साल 2015 मध्ये अफगानी संसद भवन ची निर्मिती पूर्ण झाली आहे. त्याचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अफगानिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्षांनी संयुक्त रूपाने केले होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.