गेल्या काही वर्षात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दराने वाहन चालकांच्या जीवाला घोर लावला आहे. त्यात दुचाकीच्या किंमती पण लाखांच्या घरात पोहचल्याने त्यांना मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे. सध्या इलेक्ट्रिक स्कूटर अनेकांना योग्य पर्याय वाटत आहे. जर तुमचा रोजचा प्रवास 40-50 किलोमीटरपर्यंत असेल तर ही इलेक्ट्रिक स्कूटर तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. अवघ्या 10 रुपयांच्या चार्जिंगमध्ये कंपनीची स्कूटर 50 ते 60 किलोमीटरचे अंतर कापू शकेल. विशेष म्हणजे ही स्कूटर कंपनी बजेट फ्रेंडली आहे. त्यासाठी तुम्हाला फार मोठी किंमत मोजावी लागणार नाही. कोणती आहे ही कंपनी?
कोणती आहे ही कंपनी ?
बाजारात VDS कंपनीची TAXMO स्कूटर चर्चेत आहे. या स्कूटरचे सर्वात चांगले वैशिष्ट्ये म्हणजे तिची बॅटरी. या बॅटरी खास करून लिथियम-आयन वा लीड-ॲसिड बॅटरीवर चालतात. या स्कूटर कमी खर्चात अधिक अंतर कापतात. जर वीजेसाठी प्रति युनिट 8 रुपये खर्च ग्राह्य धरला तरी एका इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी पूर्णपणे चार्ज करण्यासाठी जवळपास 1 ते 1.5 यूनिट खर्च येतो. एक बॅटरी पूर्णपणे चार्ज करण्यासाठी 10 ते 12 रुपयांच्या दरम्यान खर्च येतो. चार्जिंगनंतर ही स्कूटर आरामशीर 50 ते 60 किलोमीटर अंतर कापते. या स्कूटरची किंमत 50 हजार रुपये इतकी आहे.
कमी खर्चात जास्त अंतर
एकदा चार्ज केल्यावर ही स्कूटर 50-60 किलोमीटरचे अंतर कापते. पेट्रोलच्या मानाने हा खर्च कमी आहे. ही स्कूटी पर्यावरण अनुकूल आहे. त्यामुळे प्रदूषण टळते. इलेक्ट्रिक स्कूटरला इंजिन नसते. त्यामुळे तिच्या सर्व्हिसिंगची गरज पडत नाही. केंद्र सरकार इलेक्ट्रिक वाहनांवर सध्या सबसिडी देते. त्याचा मोठा फायदा ग्राहकांना होतो.
इलेक्ट्रिक स्कूटीचा पर्याय योग्य का?
जर तुम्ही दररोज 40-50 किलोमीटरपर्यंतचे अंतर कापत असाल तर इलेक्ट्रिक स्कूटरचा पर्याय तुमच्यासाठी चांगला ठरू शकतो. पण चार्जिंग आणि बॅटरी लाईफबाबत काळजी घ्यावी लागते. अवघ्या 10 रुपयांच्या चार्जिंगमध्ये 60 किलोमीटर धावणारी इलेक्ट्रिक स्कूटर सर्वसामान्यांसाठी फायदेशीर पर्याय आहे. तिची किंमत सुद्धा कमी आहे.