चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा संपल्यानंतर आयसीसीने वनडे क्रमावारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत भारतीय गोलंदाज आणि फलंदाजांचा दबदबा दिसला. पण अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत मात्र थोडी निराशा पदरी पडली आहे. भारताकडून अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा यांनी विजयात मोलाची साथ दिली होती. मात्र त्यांचं योगदान आयसीसी क्रमवारीत प्रभावी ठरलं नाही. दोघांनी आयसीसीच्या नव्या क्रमवारीत फटका बसला आहे. आयसीसी अष्टपैलू क्रमवारीत हार्दिक पांड्या 22व्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर रवींद्र जडेजाला एका स्थानाचं नुकसान झाला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत हार्दिक पांड्याने 4 विकेट आणि एकूण 99 धावा केल्या. पण त्याच्या या धावा विजयासाठी खूपच महत्त्वाच्या होता. हायप्रेशर सामन्यात शेवटी येऊन धडाधड धावा करून संघाला पराभवाच्या दरीतून बाहेर काढलं होतं. पण असं असूनही त्याला फटका बसला आहे. आयसीसी वनडे क्रमवारीत 181 गुणांसह 22व्या स्थानावर आहे.
दुसरीकडे, अष्टपैलू अक्षर पटेलचं चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत प्रमोशन झालं होतं. पाचव्या स्थानावर त्याला फलंदाजी करण्याची संधी मिळाली होती. पण त्याच्या वनडे रॅकिंगमध्ये फार काही बदल झाला नाही. सध्या 13 व्या स्थानावर असून त्याचं 200 रेटिंग प्वॉइंट आहेत. दुसरीकडे रवींद्र जडेजाची नवव्या स्थानावरून दहाव्या स्थानावर घसरण झाली आहे. त्यामुळे आयसीसी अष्टपैलू वनडे रँकिंगमध्ये टॉप 10 मध्ये एकच भारतीय खेळाडू आहे आणि तेही दहाव्या क्रमांकावर..
अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर अफगाणिस्तानचा अझमतुल्लाह ओमारजई आहे. त्याने 296 गुणांसह पहिलं स्थान पटकावलं आहे. तर दुसऱ्या स्थानावर मोहम्मद नबी असून त्याने 292 गुण मिळवले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर झिम्बाब्वेचा सिकंदर रझा आहे. त्याचे 253 गुण आहेत. न्यूझीलंडचा मिचेल सँटनर 248 गुणांसह चौथ्या, बांगलादेशचा मेहदी हसन पाचव्या स्थानावर आहे.