कर्नाटकातील अभिनेत्री रन्या राव हिला काही दिवसांपूर्वीच सोने तस्करी प्रकरणी विमानतळावरच अटक करण्यात आली आहे.
तपासामध्ये रन्याने यापूर्वी अनेकदा सोन्याची तस्करी केल्याचे समोर आले आहे. पण ती प्रत्येकवेळी तपास यंत्रणांच्या तावडीतून कशी सुटली, यावरून प्रश्न उपस्थित झाले आहेत.
रन्या हिचे सावत्र वडील आयपीएस असून डीजीपी दर्जाचे अधिकारी आहेत. त्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे.
रन्या राव हिचे पती कर्नाटकात आर्किटेक्ट असून चार महिन्यांपूर्वीच त्यांचा विवाह झाला आहे.
रन्या हिच्या सोने तस्करीसाठी वडिलांनी तपास यंत्रणांवर दबाव आणला की नाही, याच्या चौकशीचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.
लग्नासाठी कुणाला आमंत्रित करण्यात आले होते, याची माहिती सीबीआयकडून गोळा केली जात आहे. सर्व वऱ्हाडी आता सीबीआयच्या रडारवर आले आहेत.
जोडप्याला लग्नामध्ये कुणी किती महागडी गिफ्ट दिली, याचीही चौकशी केली जाणार आहे. त्यातून तस्करीची आणखी लिंक लावण्याचा प्रयत्न सीबीआयकडून केला जाणार आहे.
सोने तस्करीमध्ये कुणी हायप्रोफाईल व्यक्ती आहे किंवा नाही, याचा तपास यंत्रणांकडून हाती घेण्यात आला आहे.
भाजपचे सरकार असताना रन्या राव हिला औद्योगिक क्षेत्रामध्ये जमीन देण्यात आली होती. त्याचीही चौकशी सीबीआयकडून केली जाणार आहे.