क्रिकेट विश्वातून अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. भारताचे माजी आणि दिग्गज खेळाडू सय्यद आबिद अली यांचं निधन झालं आहे. सय्यद आबिद अली यांनी 12 मार्चला जगाचा निरोप घेतला. ते 83 वर्षांचे होते. अली हे भारतयी संघात ऑलराउंडर म्हणून खेळायचे. अली यांची ऑलराउंडर या शब्दाला साजेशी अशी कामगिरी केली. अली यांनी त्यांच्या कारकीर्दीत 416 विकेट्स घेतल्या. तसेच 13 शतकंही झळकावली. तसेच अली हे त्यांच्या फील्डिंगसाठीही ओळखले जायचे. अली यांच्या निधनामुळे क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. लिटील मास्टर सुनील गावसकर यांनी अली यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे.
ही फार वाईट बातमी आहे. ते मोठ्या मनाचे क्रिकेटर होते. अली टीमच्या गरजेनुसार सर्वकाही करायचे. अली यांनी निर्णायक क्षणी मिडल ऑर्डरमध्ये बॅटिंग केली. तसेच लेग साईड कॉर्डन येथे अविश्वसनीय अशा कॅचही घेतल्या. ज्यामुळे आमचा स्पिन अटॅक आणखी मजबूत होता”, असं गावसकर म्हणाले.
आबिद अली यांचा जन्म 9 सप्टेंबर 1941 रोजी हैदराबादमध्ये झाला. अली यांची वयाच्या 15 व्या वर्षी शाळेकडून क्रिकेट खेळण्यासाठी निवड करण्यात आली. अली यांनी फिल्डिंगने प्रभावित केलं. त्यामुळे निवड समितीने अली यांची निवड केली. अली यांची शालेय स्तरावर 3 वर्ष क्रिकेट खेळल्यानंतर हैदराबाद ज्युनिअर टीममध्ये निवड करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्याच वर्षी अली यांची रणजी ट्रॉफीसाठी निवड करण्यात आली. अली यांनी त्यानंतर मागे वळून पाहिलंच नाही.
अली यांनी त्यांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर टीम इंडियात धडक दिली. अली यांनी 1967 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण केलं. अली यांनी पहिल्याच सामन्यातील दोन्ही डावांत 33 धावा केल्या. तसेच 55 धावा देत 6 विकेट्सही घेतल्या.
आबिद अली यांनी 29 कसोटी सामन्यांमध्ये 20.36 च्या सरासरीने 1 हजार 18 धावा केल्या. अली यांनी या दरम्यान 6 अर्धशतकं झळकावलं. तसेच 42.12 च्या सरासरीने 47 विकेट्सही घेतल्या. तसेच अली यांनी 5 एकदिवसीय सामन्यांमध्ये 93 धावा करण्यासह 7 विकेट्सही घेतल्या.