आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेनंतर आता क्रिकेट चाहत्यांचं लक्ष हे आयपीएलच्या 18 व्या मोसमाकडे (IPL 2025) लागून आहे. या 18 व्या मोसमात 10 संघांमध्ये एका ट्रॉफीसाठी चुरस पाहायला मिळणार आहे. या 18 व्या हंगामाला शनिवारी 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. तर त्यानंतर दुसऱ्याच दिवशी महामुकाबला होणार आहे. या सामन्याकडे साऱ्या क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून आहे. इतकंच काय तर क्रिकेट चाहत्यांना या सामन्याची प्रतिक्षा आहे. रविवारी 23 मार्चला आयपीएल इतिहासातील 2 यशस्वी संघ भिडणार आहेत.
क्रिकेट चाहत्यांना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या सामन्याची प्रतिक्षा आहे. हार्दिक पंड्या मुंबईचं आणि ऋतुराज गायकवाड चेन्नईचं नेतृत्व करणार आहेत. मात्र या सामन्यात सर्वांचं लक्ष हे माजी कर्णधार रोहित शर्मा आणि महेंद्रसिंह धोनी यांच्याकडे असणार आहे. दोन्ही संघ या हंगामात एकूण 2 वेळा भिडणार आहेत. चेन्नई विरुद्ध मुंबई यांच्या 23 मार्चनंतर 20 एप्रिलला सामना होणार आहे. या सामन्याआधी मोठी बातमी समोर आली आहे.
द न्यू इंडियन एक्सप्रेस रिपोर्टनुसार, सीएसकेच्या सामन्यांची लोअर स्टँडची तिकीटं मूळ किमतीच्या 10 पटीने ब्लॅकमध्ये विकली जात आहे. चेन्नईने आतापर्यंत घरच्या मैदानात होणाऱ्या सामन्यांची तिकीट विक्री अजून सुरु केलेली नाही. अशात ही परिस्थिती आहे. यावरुन चेन्नईच्या सामन्यांची किती क्रेझ आहे, हे लक्षात येतं.
तिकीट रिसेल वेबसाईट Viagogo नुसार, चेन्नई विरुद्ध मुंबई सामन्याचील kmk लोअर स्टँडमधील तिकीटची किंमत ही 85 हजार 380 इतकी आहे. या स्टँडमधील 84 तिकीटं उपलब्ध आहेत, या तिकीटाची सुरुवातीची किंमत 12 हजार 512 रुपये आहे. सीएसकेचे घरच्या मैदानात एकूण 7 सामने होणार आहेत. त्यापैकी 6 सामन्यांची तिकीटं वेबसाईटवर उपलब्ध आहेत. तर फक्त 28 मार्चला बंगळुरुविरुद्ध होणाऱ्या सामन्याचं तिकीट उपलब्ध नाही.
मुंबई इंडियन्स टीम : हार्दिक पंड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, जोफ्रा आर्चर, नमन धीर, रॉबिन मिंज, कर्ण शर्मा, रायन रिकल्टन, दीपक चाहर, अल्लाह घझनफर, विल जॅक्स, केएल श्रीजीत, रीस टॉप्ली, मिचेल सँटनर, राज अंगद बावा, वी. सत्यनारायण, बेवन जॅकब्स, विग्नेश पुथुर, अर्जुन तेंडुलकर, लिज्जाड विलियम्स आणि अश्वनी कुमार.
चेन्नई सुपर किंग्स टीम : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), महेंद्रसिंह धोनी, रवींद्र जडेजा, मथीशा पथिराणा, शिवम दुबे, आर अश्विन, डेवन कॉनव्हे, राहुल त्रिपाठी, रचिन रवींद्र, खलील अहमद, नूर अहमद, विजय शंकर, सॅम करन, शेख रशीद, अंशुल कंबोज, मुकेश चौधरी, दीपक हुड्डा, गुरजपनीत सिंह, नाथन एलिस, जेमी ओवर्टन, कमलेश नागरकोटी, रामकृष्ण घोष, आंद्रे सिद्धार्थ, वंश बेदी आणि श्रेयस गोपाळ.