महामार्ग जनआक्रोश समिती करणार गुरुवारी आंदोलन
esakal March 13, 2025 12:45 AM

‘महामार्ग समिती’चे आज आंदोलन
खेड, ता. ११ : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम संथगतीने सुरू आहे. महामार्गाच्या अपूर्णावस्थेतील कामांमुळे चाकरमान्यांना प्रत्येक सणात जीवघेणा प्रवास करत गाव गाठावे लागत आहे. महामार्ग काम रखडल्याच्या निषेधार्थ मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समिती १३ मार्चला सायंकाळी ६ वाजता माणगाव-बायपास व संगमेश्वर एसटी आगारासमोर सरकारच्या ‘डेडलाईन’ची होळी पेटवणार आहे. महामार्गावरील पळस्पेपासून सिंधुदुर्गपर्यंत एकाच दिवशी आंदोलन छेडून प्रशासनाच्या नावाने ‘शिमगा’ करणार आहे. मुंबई-गोवा महामार्ग पूर्णत्वाच्या आजवर देण्यात आलेल्या सर्व ‘डेडलाईन’ हवेत विरल्या आहेत. महामार्गाच्या अपूर्णावस्थेतील कामासह ठिकठिकाणी निकृष्ट दर्जाच्या झालेल्या कामामुळे कोकणवासियांची कसरत अजूनही कायम आहे.
--

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.