भारतीय वंशाच्या नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर हे लवकरच पृथ्वीवर परतणार आहेत.
हे दोघे 10 दिवसांसाठी अंतराळात गेले होते. मात्र तांत्रिक बिघाडामुळे ते 10 महिने अंतराळात अडकले होते.
आता ते स्पेसएक्स ड्रॅगन स्पेसक्राफ्टमधून आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकातील इतर अंतराळवीरांसह पृथ्वीवर येणार आहेत.
अंतराळात अडकल्यामुळे सुनीता विल्यम्स यांचे नाव सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
अंतराळात अनेक महिने मुक्काम करावा लागला असला तरी तिथे अनेक महत्त्वाचे वैज्ञानिक संशोधन करण्यात आल्याचा दावा केला जात आहे.
तर सुनीता विल्यम्स नासामध्ये काम करतात तिथल्या अंतराळवीरांना पगार नेमका किती मिळतो, ते जाणून घेऊया.
नासाच्या अंतराळवीरांना अमेरिकन सरकारच्या जनरल शेड्यूल (GS) वेतनश्रेणीनुसार GS-13 ते GS-15 श्रेणींमध्ये पगार दिला जातो.
GS-13 वेतनश्रेणीमध्ये वार्षिक 81,216 ते 105,579 डॉलर्स म्हणजे जवळपास 70 ते 92 लाखांपर्यंत पगार मिळतो.
तर GS-15 श्रेणीनुसार 70 लाख ते 1.27 कोटींपर्यंत पगार मिळतो. याच वेतनश्रेणीनुसार विल्यम्स यांना वर्षाला 1,52,258 डॉलर्स म्हणजे जवळपास 1.26 कोटी रुपये इतका पगार मिळतो.