उन्हाळ्याच्या सुटीत लांबपल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना मोठी गर्दी असते.ही बाब विचारात घेऊन पुणे रेल्वे विभागाने होळीनिमित्त पुणे ते दानापूर, गोरखपूर आणि मुझफ्फरपूरसाठी एकूण 13 विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांचे हाल होऊ नये म्हणून रेल्वे स्टेशनवर मोठा मंडप टाकण्यात आला आहे.
प्रवाशांची व्यवस्था रेल्वे कडून करण्यात आली आहे. याबाबत पुणे विभागीय रेल्वे मंडळाचे अध्यक्ष राजेश कुमार वर्मा यांनी दिली. प्रवाशांसाठी मोठी व्यवस्था रेल्वे स्टेशनवर करण्यात आली आहे. रेल्वे स्टेशनवर गर्दी होऊ नये म्हणून दानापूर एक्सप्रेस किंवा उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असल्याने त्यांच्यासाठी प्लॅटफॉर्मच्या बाजूला मंडप टाकण्यात आलेला आहे.
कसे असेल वेळापत्रक?-दानापुर-पुणे विशेष (२ फेऱ्या) गाडी क्रं (०१४१९) विशेष ट्रेन पुणे येथून ११.०३.२०२५ रोजी १९:५५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ०४.३० वाजता दानापुर येथे पोहोचेल.
गाडी क्र.(०१४२०) ही विशेष ट्रेन दानापुर येथून १३.०३.२०२५ रोजी ०६:३० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी १७:३५ वाजता पोहोचेल.
पुणे – मालदा टाउन विशेष ट्रेन (२ फेऱ्या) गाडी क्रं (०३४२६) विशेष ट्रेन पुणे येथून २३.०३.२०२५ रोजी २२.०० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी १६.३० वाजता मालदा टाउन येथे पोहोचेल.