हरियाणात फरीदाबाद नगरपालिकेचा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार प्रवीण बत्रा जोशी यांनी दणदणीत विजय मिळवला आहे.
देशात सर्वाधिक फरकाने महापौरपदाची निवडणूक जिंकण्याचा प्रवीण बत्रा जोशी विक्रम यांच्यावर नोंदवला गेला आहे.
फरीदाबाद येथील भाजपच्या उमेदवार प्रवीण बत्रा जोशी यांनी तब्बल ३१६८५२ मतांच्या फरकाचा नवा विक्रम प्रस्थापित केला.
भाजप उमेदवार प्रवीण बत्रा जोशी यांना ४१६९२७ मतं मिळाली.
प्रवीण बत्रा जोशी सध्या हरियाणा राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष आहेत.
५९ वर्षीय प्रवीण बत्रा जोशी या एका राजकीय कुटुंबातून आल्या आहेत.
प्रवीण जोशी यांचे कुटुंब बऱ्याच काळापासून संघाशी जोडलेले आहे.
प्रवीण जोशी यांनी आपल्या विजयाचे श्रेय प्रत्येक भाजप कार्यकर्त्याला दिले
प्रवीण बत्रा जोशी यांच्या ऐतिहासिक विजयाबद्दल त्यांचे सर्वांकडून अभिनंदन होत आहे.