बंगळुरु :इन्फोसिसचे सहसंस्थापक आणि भारतात आधार आणि यूपीआय च्या निर्मितीसाठी महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या नंदन निलेकणी यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेसंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे.भारताची अर्थव्यवस्था 2035 पर्यंत 8 ट्रिलियन डॉलर्सची होईल, असं निलेकणी म्हणाले. भारताला विकास दर 6 टक्क्यांवरुन 8 टक्क्यांवर घेऊन जावा लागेल, असं ही त्यांनी म्हटलं.
इन्फोसिसचे सह संस्थापक नंदन निलेकणी 2035 पर्यंत भारत जगातील सर्वाधिक पसंतीचा आयपीओ बनेल असं म्हणाले. बंगळुरुत ते अरकामवीसी कार्यक्रमात बोलत होते. कंपन्यांना पुन्हा भारतात लिस्ट व्हायचं आहे, लोक परत येत आहेत, घरवापसी होतेय, असंही नंदन निलेकणी म्हणाले.
भारतात सध्या स्टार्टअपची संख्या 150000 लाख इतकी असून ती 2035 पर्यंत ती 10 लाखांवर जाईल अशी अपेक्षा असल्याचं ते म्हणाले.नंदन निलेकणी यांनी भारतात दरवर्षी 20 टक्के स्टार्टअप वाढायला हवेत, असं म्हटलं. भारतात सध्या 150000 स्टार्टअप होते.
भारत अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकाचं आयपीओ मार्केट आहे. पहिल्या क्मरांकावर जाण्यासाठी रिटेल गुंतवणूकदारांची संख्या वाढल्यामुळं दुसऱ्या क्रमांकापर्यंत पोहोचल्याचं ते म्हणाले. आपल्याकडे 10 इक्विटी गुंतवणूकदार आहेत. गेल्या तीन वर्षात एसआयपीद्वारे होणाऱ्या गुंतवणुकीत देखील दुप्पट वाढ झाल्याचं अहवालातून समोर आलं आहे. एसआयपीचा इन्फ्लो 2024-25 मध्ये 23 हजार कोटींवर पोहोचल्यां ते म्हणाले.
भारताच्या वेगवान विकासासाठी चार गोष्टी बदलण्याची गरज असल्याचं देखील नंदन निलेकणी म्हणाले. भारताला आर्थिक विकास दर 6 टक्क्यांवरुन 8 टक्क्यांवर न्यावा लागेल. भारताला टेक्नोलॉजी, एंटरप्रेन्योरशिप, फॉर्मलायझेशन आणि कॅपिटल या चार गोष्टींमध्ये अनलॉक्सची गरज आवश्यक असल्याचं म्हटलं.
नंदन निलेकणी यांनी भारतात विविध राज्यांमध्ये जीडीपी आणि जन्मदरामध्ये अंतर आहे. ज्यामुळं मोठ्या संख्येनं स्थलांतर होत आहे. भारताच्या वेगवेगळ्या भागात स्थलांतर होत आहे. मात्र, विषमता कायम आहे. छोट्या व्यापाऱ्यांबद्दल बोलताना ते म्हणाले की छोटे उद्योग पुढं वाढत नाहीत याचं कारण त्यांना भांडवल मिळत नाही. आपल्याला वेगानं पुढं जायचं असल्यास या समस्येवर मार्ग काढावा लागेल.
नंदन निलेकणी यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सला भारताच्या डिजिटल भविष्यासाठी महत्त्वाचं ठरवलं. ओपन सोर्स एआय मॉडेल्सचं लक्ष भारतीय भाषांमध्ये अधिकाधिक डाटा तयार करणं हे असलं पाहिज, असंही ते म्हणाले.
एआयचा वापर कृषी आणि शिक्षण या क्षेत्रात करण्याची गरज आहे. एआयचा वापर कृषी क्षेत्रात कसा केला जाईल यावर लक्ष दिलं पाहिजे. ओपन एग्री नेटवर्क एआयचा वापर करेल.शिक्षणात देखील एआयचा वापर करायला पाहिजे असं ते म्हणाले.
इतर बातम्या :
Sensex : सेन्सेक्स 100000 च्या पार जाणार, सुपरफास्ट कमबॅक, ‘या’ संस्थेची सर्वात मोठी भविष्यवाणी
अधिक पाहा..