आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश तात्याबा वाघ यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार अक्षय जावळकर असून त्याला हे कृत्य करण्यास मोहिनी वाघनेच प्रवृत्त केल्याचं पोलिसांच्या तपासात उघडकीस आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे सतीश यांचा काटा काढण्यासाठी जादूटोण्याचा प्रयोग केल्याची माहिती आरोपपत्रातून समोर आली आहे. लष्कर न्यायालयात नुकतेच एक हजार पानांचे दोषारोपपत्र गुन्हे शाखेकडून दाखल करण्यात आले आहे. यामधून ही माहिती उघडकीस आली आहे. सतीश वाघ यांचा 9 डिसेंबर 2024 रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास अपहरण करून पंधरा मिनिटांतच तब्बल 72 वार करून खून करण्यात आला होता. त्यानंतर त्यांचा मृतदेह शिंदवणे घाटात फेकून देण्यात आला होता.
Satish Bhosale Arrest : खोक्याची तडीपारी निश्चित...भाजप आमदार सुरेश धसांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. त्याला प्रयागराजमधून अटक केली आहे. खोक्याने केलेल्या मारहाणीचे काही व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. मात्र, गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता. अखेर पोलिसांनी त्याला प्रयागराज येथून अटक केली आहे. तर आज त्याला प्रयागराज कोर्टात हजर करणार आहेत. तर बीड कोर्टापुढे हजर होण्याआधी त्याची तडीपारी निश्चित मानली जात आहे.