Holi 2025 Hindi Songs : 'लेट्स प्ले होली...' रंगांची उधळण करत बेभान होऊन नाचा, प्लेलिस्टमध्ये टॉप १० हिंदी गाणी आताच सेव्ह करा
Saam TV March 13, 2025 02:45 PM

धुळवडीचा सण फक्त एका दिवसावर येऊन ठेपला आहे. उद्या (14 मार्च) ला धुळवड साजरी केली जाणार आहे. धुळवड म्हणजे रंगांचा सण होय. या दिवशी ऐकमेकांना रंग लावून होळीच्या रंगात रंगवले जाते. या दिवशी अनेक होळी डीजे पार्टी आयोजित केल्या जातात. होळी (Holi 2025) म्हटली की गाणी आलीच.

होळीला गाण्यांवर बेभान होऊन नाचायची मजाच वेगळी आहे. होळीला बॉलिवूच्या गाण्यांवर थिरकण्यासाठी अनेकजण आतुर असतात. होळीला परफेक्ट गाण्यांचे सिलेक्शन असेल तर नाचायला मजा येते. त्यासाठीच होळीच्या टॉप १० हिंदी गाण्याची (Top 10 Hindi Holi Songs) प्लेलिस्ट आताच नोट करा.

होळी स्पेशल टॉप १० हिंदी गाणी

बलम पिचकारी

'ये जवानी है दीवानी' चित्रपटातील 'बलम पिचकारी' हे गाणे रंगत आणखी वाढवेल. या गाण्यावर बेभान होऊन नाचण्याची मजाच वेगळी आहे. या गाण्यात रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण यांची भन्नाट केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.

रंग बरसे

'सिलसिला' चित्रपटातील 'बरसे' या गाण्यावर मित्रांसोबत तुफान डान्स करा. हे गाणे तुमच्या लिस्टमध्ये असायलाच हवे. या गाण्यामध्ये अमिताभ बच्चन यांनी भन्नाट डान्स केला आहे. या गाण्यावर होळी सणाचा आनंद लुटा.

डू मी ए फेवर लेट्स प्ले होली

प्रियांका चोप्रा आणि अक्षय कुमारचे 'डू मी ए फेवर लेट्स प्ले होली' होळी हा सण पूर्ण नाही. यात प्रियांका आणि अक्षयच्या केमिस्ट्रीने चाहते दिवाने झाले आहेत. 'वक्त: द रेस अगेन्स्ट टाइम' या चित्रपटातील हे आहे.

होली के दिन दिल खिल जाते हैं

'शोले' चित्रपटातील 'होली के दिन दिल खिल जाते हैं' हे गाणे होळीचा उत्सव आणखी रंगतदार बनवते. होळी पार्टी या गाण्याशिवाय अपूर्ण वाटते. या गाण्यात धर्मेंद्र आणि हेमा मालिनी पाहायला मिळत आहे. या गाण्यामुळे होळीचा मूड आणखी सुंदर होतो.

होली खेले रघुवीरा

'बागबान' चित्रपटातील 'होली खेले रघुवीरा' गाणे म्हणजे होळीची शान होय. हे खूप लोकप्रिय गाणे आहे. या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी मुख्य भूमिकेत आहेत. कुटुंबासोबत या गाण्यावर होळीला नक्की नाचा.

जय जय शिव शंकर

'आप की कसम' चित्रपटातील 'जय जय शिव शंकर' हे गाणे म्हणजे होळी सणाची पावर आहे. हे गाणे गायक किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांचे गायले आहे. या गाण्याच्या व्हाइब्ज खूप भन्नाट आहेत. हे होळीचे लोकप्रिय गाणे आहे. हे गाणे वाजताच पाय थिरकायला लागतात.

आज ना छोडेंगे

'कटी पतंग' या चित्रपटातील 'आज ना छोडेंगे...' हे गाणे होळीच्या पार्टीसाठी प्रामुख्याने वाजवले जाते. हे सुपरहिट गाणे लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायले आहे.

बद्री की दुल्हनिया

'बद्री की दुल्हनिया' चित्रपटातील 'बद्री की दुल्हनिया' या गाण्यावर होळी डीजे पार्टीत नाचण्याची मजाच वेगळी आहे. या गाण्यावर रुण धवन आणि आलिया भट्ट यांनी भन्नाट डान्स केला आहे. हे गाणे होळीची रंगत वाढवते.

गोरी तू लट्ठ मार

'टॉयलेट- एक प्रेम कथा' चित्रपटातील 'गोरी तू लट्ठ मार' हे गाणे होळीच्या रंगात तुम्हाला रंगवून टाकेल. या चित्रपटात अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत आहेत.

तुम तक

'रांझना' चित्रपटातील 'तुम तक' हे गाणे होळीत प्रेमाचे रंग भरतो. या गाण्यात सोनम कपूर आणि धनुषची भन्नाट केमिस्ट्री पाहून चाहते फिदा होतात. 'तुम तक' हे गाणे होळी या सणाची शोभा वाढवते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.