Pune News: धडापासून शिर वेगळं अन् हात- पाय मोडून विहीरीत फेकलं, पुण्यात नेमकं चाललंय काय?
Saam TV March 13, 2025 05:45 PM

पुण्यातील अहिल्यानगरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अहिल्यानगरच्या दाणेवाडी गावातील एका विहीरीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे. मुख्य म्हणजे अज्ञात व्यक्तीची अमानूषपणे मारहाण करून आरोपीनं मृतदेह विहीरीत फेकलंय. शीर धडापासून वेगळं आणि हात पाय देखील मोडून विहीरीत फेकलं आहे. हा मृतदेह नेमका कुणाचा याचा तपास पोलीस करीत आहेत.

अहिल्यानगरच्या दाणेवाडी गावातील एका विहीरीत मृतदेह आढळल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. या मृतदेहाला जबर मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. आधी अमानूषपणे मारहाण नंतर आरोपीने हात पाय आणि शिर धडापासून वेगळे केलं आहे. आरोपीने मृतदेह विहीरीत फेकून दिलंय.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी या प्रकरणाच्या तपासाला सुरूवात केली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून एक १८ वर्षीय विद्यार्थी बेपत्ता आहे. बारावीत शिक्षण घेणारा विद्यार्थी पेपरला गेल्यानंतर तो पुन्हा घरी आलाच नाही.

विद्यार्थी हरवला असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. विहीरीत सापडलेला मृतदेह विद्यार्थ्याचा आहे की नाही, याचा कसून तपास पोलीस करीत आहेत. मृतदेह ज्या पद्धतीने धक्कादायक स्थितीत आढळला आहे, त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.