Kushal Badrike : "वो स्त्री है..."; कुशल बद्रिकेच्या बायकोने होळीतून काढला नारळ, पाहा VIDEO
Saam TV March 14, 2025 05:45 PM

आज देशभरात होळीचा सण साजरा केला जात आहे. धुळवडीच्या रंगात लोक रंगली आहेत. होळी (Holi 2025) हा रंगांचा सण आहे. अनेकजण या सणाची आतुरतेने वाट पाहतात. कलाकार मंडळी देखील होळीची मजा घेताना पाहायला मिळतात. धुळवडीच्या आधी एक दिवस होलिका दहन केले जाते. होळी पेटवून आयुष्यातील नकारात्मतेला दूर करून सकारात्मकता स्वीकारली जाते. कलाकारांचे होळी सेलिब्रेशनचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

सेलिब्रिटी चाहत्यांना शुभेच्छा देताना पाहायला मिळतात. अशात आता मराठी अभिनेता आणि कॉमेडियन कुशल बद्रिकेने (Kushal Badrike ) सोशल मीडियावर एक खास पोस्ट टाकली आहे. तो कुटुंबासोबत होळीचा सण साजरा करताना दिसत आहे. कुशलने इन्स्टाग्रामवर बायकोचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात कुशलची होलिका दहनाच्या दिवशी पेटत्या होळीतून नारळ काढताना दिसत आहे. हे पाहून कुशल थक्क झाला आहे.

कुशलच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. बद्रिकेने व्हिडीओला एक हटके कॅप्शन दिलं आहे. त्यांनी लिहिलं की, "वो स्त्री है, कुछ भी कर सकती है" कुशल कायमच आपल्या कुटुंबासोबतच्या खास क्षणांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. तो एक उत्तम अभिनेता आहे. त्याने आजवर आपल्या विनोदी शैलीने अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य आणले आहे.

पेटत्या होळीतून नारळ काढण्याची कोकणात पद्धत आहे. 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमामुळे कुशलला लोकप्रियता मिळाली. त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. कुशल आणि त्याची बायको सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.