१७०३ साली औरंगजेब पुण्यात आला आणि हे शहर त्याला फार आवडले. याच पुण्याचे नाव बदलण्याचा त्याने निर्णय घेतला.
पुण्यावरून संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रावर नजर ठेवता येत होती. मराठ्यांवर विजय मिळवण्यासाठी औरंगजेबाने इथे छावणी स्थापन केली.
मराठ्यांचे किल्ले वर्षोनुवर्षे वेढा घालूनही मिळत नव्हते, आणि मिळाले तरी मराठे पुन्हा जिंकून घेत होते. त्यामुळे औरंगजेब वैफल्यग्रस्त झाला.
मराठ्यांना हरवण्यात अपयश आल्याने अपमान झाकण्यासाठी त्याने पुण्याचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला.
औरंगजेबाच्या नातवाचा पुण्यात मृत्यू झाला. त्याच्या स्मरणार्थ त्याने ‘मूही-उल-मिलत’ नावाची व्यापारी पेठ वसवली.
मुघल सरदार व अधिकाऱ्यांसाठी कोठे आणि मनोरंजन केंद्रे उभारण्यात आली, जेणेकरून ते पुण्यात रमून जातील.
आपल्या नातवाच्या नावावरून औरंगजेबाने पुण्याचे नाव ‘मुहियाबाद’ असे ठेवले आणि आपल्या साम्राज्याचा प्रभाव दाखवण्याचा प्रयत्न केला.
औरंगजेबाचा दरबारी इतिहास सांगणाऱ्या ‘मआ-सिर-अलमगिरी’ ग्रंथात या नामांतराचा स्पष्ट उल्लेख आहे.
औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मराठ्यांनी पुन्हा पुण्यावर नियंत्रण मिळवले आणि ‘मुहियाबाद’ हे नाव कायमचे इतिहासजमा केले.
औरंगजेबाने वसवलेली हीच पेठ पुढे ‘बुधवार पेठ’ म्हणून ओळखली जाऊ लागली, आणि आजही ती पुण्यात अस्तित्वात आहे.