वन विभागाने सतीश भोसले उर्फ खोक्याच्या ग्लास हाऊस नावाच्या घरावर बुलडोझर चालवला होता. अशातच आता या पाडलेल्या घराला कोणतीरी आग लावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अज्ञातांकडून सतीश भोसलेच्या घराचा परिसर पेटविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामध्ये जनावरांचा चाऱ्यासह काही पशूंचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
Mumbai-Amravati Express Accident : मुंबई-अमरावती एक्सप्रेसला भरधाव ट्रकची धडकजळगाव जिल्ह्यातील बोडवड रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी पहाटे धक्कादायक अपघात घडला आहे. मुंबई-अमरावती एक्सप्रेसला एका भरधाव ट्रकने धडक दिल्यामुळे हा अपघात घडला. मात्र, रेल्वेच्या धीम्या गतीमुळे मोठा अनर्थ टळल. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
Devendra Fadnavis : गडचिरोलीला माईनिंग हब म्हणून विकसित करण्यासाठी केंद्राने सहकार्य करावे - CM फडणवीसमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी गडचिरोली मायनिंग हब, नागपूर विमानतळ, स्थानिक स्वराज्य संस्थांना वित्त आयोगाचा निधी या संदर्भात त्यांनी पंतप्रधानांशी चर्चा केली. यावेळी फडणवीस यांनी गडचिरोलीला माईनिंग हब म्हणून विकसित करण्यासाठी केंद्राने सहकार्य करावे, अशी मागणी केल्याचं माध्यमांना सांगितलं.
Satish Bhosale Arrest : सतीश भोसले उर्फ खोक्याला घेऊन पोलिस बीडकडे रवानासतीश भोसले उर्फ खोक्याला घेऊन बीड पोलिस छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी सतीश भोसलेला प्रयागराजमध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर काल रात्री बीड पोलीस भोसलेला ताब्यात घेऊन आज पहाटे छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावर दाखल झाले. तिथून आता पोलिस त्याला बीडला घेऊन निघाले आहेत. शिवाय आजच त्याला न्यायालयात हजर देखील केलं जाणार आहे.