खासदार असले तरीही श्रीकांत शिंदे हे अगोदर डॉक्टर आहेत. त्यामुळे निरोगी आयुष्य किती महत्त्वाची आहे आणि ते त्यासाठी काय करतात वाचा…
लोकसभा-विधानसभा निवडणुकी दरम्यान त्यांनी अनेक दौरे, शाखांना भेटी, सभा घेणे अशी धावपळ सुरु होती. मात्र यावेळी चेहऱ्यावर थकवा दिसू नये याकडे मी लक्ष देतो असं ते म्हणाले.
लोकप्रतिनिधी उत्साही असतील तरच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह येतो त्यासाठी शारीरिक आणि मानसिक फिटनेस हवाचं. म्हणूनच व्यायाम आणि आहारावर कटाक्षाने ते भर देतात.
सकाळी लवकर उठून ते किमान दीड तास जिममध्ये व्यायाम करतात. वेळेचे नियोजन करत ते सायकलिंग आणि ट्रेडमिलवर धावण्याचा व्यायाम करतात.
कॅलरीज घटवण्यासाठी, रक्तप्रवाह सुधारून दिवसभर उत्साही राहण्याची ऊर्जा ही व्यायामाचे दोन प्रकार केले तरीही मिळते. अस त्यांच मत आहे.
अचानक काही कार्यक्रम येतात त्यामुळे त्यांनी जीममध्ये जात येत नाही मात्र,ते यातूनही वेळ काढून ते दीड तास चालण्यावर भर देतात.
काही वेळेला कामामुळे काहीच जमले नाही, तर योग आणि ध्यानधारणा शिंदे करतातचं. त्यामुळे थकवा जाणवत नाही. शरीर सुदृढ आणि मन प्रसन्न राहते. ध्यानधारणेमुळे वेळेचे नियोजनदेखील उत्तम पद्धतीने करता येते, असं ते सांगतात.
व्यायामाबरोबरचं आहार खूप महत्त्वाचा असल्याने ताटात सर्व प्रकारच्या भाज्या, भरपूर सलाड ते खातात.
वेळेवर जेवणे, कार्यक्रमांमध्ये चहा किंवा दूधयुक्त काही न घेता सकाळी ब्लॅक कॉफी घेण उत्तम दौऱ्यादरम्यान प्रवासात थकवा आणि शरीर डीहायड्रेट होऊ नये म्हणून ते जास्तीत जास्त पाणी पितात.