Best detox drinks to cleanse the body after Holi sweets: रंगांचा आनंदाचा सण म्हणजे होळी. या दिवशी एकमेकांना रंग लावून होळीच्या शुभेच्छा देतात. अनेक लोक होळी पार्टीत जातात. तेथे भरपुर खातात आणि पितात. जे लोक डाएटवर असतात ते देखील होळीच्या वेळी सर्वकाही विसरून जातात आणि तेलकट, मसालेदार, गोड पदार्थ खातात. पण याचा शरीरावर मोठा परिणाम होतो. शरीराला पून्हा आरोग्यदायी बनवण्यासाठी डिटॉक्स करणे गरजेचे असते. यासाठी पुढील गोष्टी करणे गरजेचे असते.
हायड्रेटेड राहाहोळी पार्टीनंतर शरीराला डिटॉक्स करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे भरपूर पाणी पिणे. शरीर हायड्रेटेड राहिल्याने विषारी पदार्थ आपोआप बाहेर पडतात. दिवसभरात किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे. तुळशी पेय, लिंबू पाणी, नारळ पाणी, ग्रीन टी असे काही डिटॉक्स पेये प्यावे. कोमट पाणी पिणे शरीरासाठी चांगले असते. यामुळे पचनसंस्था सुरळितपणे कार्य करते.
योग्य आहारहोळीच्या वेळी तुम्ही खूप तळलेले आणि मसालेदार पदार्थ खाता. अशावेळी तुमचे शरीराला पून्हा आरोग्यदायी बनवण्यासाठी होळीनंतर भाज्या, फळे, फायबरयुक्त आहार, दही इत्यादी पदार्थांचे आहारात सेवन करावे. खुप मसालेदार आणि तेलकट पदार्थ खाणे टाळा. बाहेरचे खाद्यपदार्थ खाऊ नका.
व्यायामशरीराला पुन्हा आरोग्यदायी बनवण्यासाठी मानसिकदृष्ट्या निरोगी असणे देखील खूप महत्वाचे आहे. म्हणून, पार्टीनंतर पुरेशी विश्रांती घ्यावी. यासोबतच, खोल श्वास घेण्याचे व्यायाम, ध्यान, व्यायाम करा. यामुळे अतिरिक्त कॅलरीज देखील बर्न होतील आणि तुम्ही तणावमुक्त व्हाल.
पुरेशी झोपशरीराला डिटॉक्सिफाय करण्यासाठी पुरेशी झोप गरजेची आहे. म्हणून रात्री किमान ७ ते ८ तासांची शांत झोप घ्यावी. यामुळे तुमचे शरीराचा ताण आणि थकवा कमी होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला ताजेतवाने वाटेल.
पुढील गोष्टी ठेवा लक्षातकॉफी आणि अल्कोहोल पिणे टाळा. यामुळे डिहायड्रेशन वाढू शकते.
कोमट पाण्याने आंघोळ करा आणि त्वचेला मॉइश्चरायझर लावा.
केसांना तेल लावा आणि सौम्य शॅम्पूचा वापर करा.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.