Pune : पुण्यातून फिरायला महाबळेश्वरला गेले, दरीत कोसळून दोघांचा मृत्यू, २ जखमी
Saam TV March 14, 2025 07:45 PM

सचिन जाधव, पुणे साम टीव्ही प्रतिनिधी

Pune Latest News Update : पुण्यातून महाबळेश्वरला फिरायला गेलेल्या दोन जणांचा दरीत कोसळून मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत्यू झालेले दोन जण पुण्याजवळील काळभोर येथील असल्याचे समजतेय.

महाबळेश्वर वाई पाचगणी रस्त्यावरील पसरणी घाटात फोर्ड एंडेवर गाडी १०० मीटर दरीत कोसळून अपघात झाला. या अपघातामध्ये लोणी काळभोर येथील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या अपघातात त्यांचे इतर दोन सहकारी गंभीर जखमी झाले आहेत. गुरूवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास हा अपघात झाल्याचे समजतेय.

अक्षय म्हस्कू काळभोर (वय २६ ), सौरभ जालिंदर काळभोर (वय २६) ही अपघातात मृत्यू झालेल्या दोन तरुणांची नावे आहेत. तर वैभव काळभोर, (वय२४ ) बजरंग पर्वतराव काळभोर (वय ३५, सर्व रा. रायवाडी, लोणी काळभोर, ता. हवेली) अशी जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत.

दोन्ही जखमींना वाई येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.लोणी काळभोर परिसरातील चार मित्र दोन दिवसांपूर्वी महाबळेश्वर या ठिकाणी फिरण्यासाठी गेले होते. फिरून झाल्यानंतर आज काल पाच वाजण्याच्या सुमारास महाबळेश्वर येथून लोणी काळभोरकडे घरी निघाले होते.दरम्यान, वाई-पाचगणी रस्त्यावरील पसरणी घाटात आले असता चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडी थेट १०० मीटर दरीत कोसळली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.