भाजपचे नेते कृपाशंकर सिंग यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंवर टीका केली आहे. कृपाशंकर सिंग म्हणाले, राज ठाकरेंना आपण काय बोलत आहोत, उद्या काय बोलणार आहोत? हे त्यांना कळत नाही. मला वाटतं राज ठाकरे सकाळी-सकाळी उठून भांग वगैरे असं काही तरी घेतात, आणि भांग पिऊन मस्त राहातात.
नाशिकमधील धक्कादायक घटना, भाजप पदाधिकाऱ्यानं व्यापाऱ्याला धमकावलं,गुन्हा दाखलनाशिक शहरातील भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कैलास कुंदलवालवर असं त्यांचं नाव आहे. त्यांच्याविरोधात नाशिकच्या भद्रकाली पोलिसांनी फिर्यादींनी दिलेल्या तक्रारीनुसार पैशांसाठी धमकावल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल केला आहे.या घटनेतील संशयित आरोपी असलेला रोहित कुंदलवाल याचे वडील असलेले भाजप पदाधिकारी कैलास कुंदलवाल हे अद्याप फरार असल्याची माहिती समोर येत आहे.
Crime News : अश्लील फोटो व्हायरल करू, माजी नगरसेवकाला धमकीबदलापूरच्या माजी नगरसेवकाला अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत 50 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या चार जणांनाबदलापूर पूर्व पोलिसांनी अटक केली आहे. माजी नगरसेवक शैलेश वडनेरे यांना धमकी देत खंडणीची मागणी करण्यात आली होत. अटक केलेल्या आरोपींचे नाव अक्षय उर्फ बकरी गोविंद जाधव, रोनित दयानंद आडारकर, दीपक मधुकर वाघमारे आणि पुष्कर हरिदास कदम अशी आहेत.
'आक्रोश मोर्चाच्या नावाखाली पैसे जमा करणारा माझाच सहकारी…'; सुरेश धसांची कबुलीबीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना मदत करायची म्हणून आक्रोश मोर्चाच्या नावाखाली धाराशिवमधील आशिष विशाळ पैसे गोळा करत होता. तो माझाच सहकारी असल्याची कबुली आमदार सुरेश धस यांनी दिली आहे. त्यानं धाराशिवमध्ये खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. याचमुळे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्या समर्थकांकडून त्याला काही दिवसांपूर्वीच मारहाण करण्यात आली होती.
लातूरमध्ये कारखान्याला भीषण आग, 40 लाखांचं नुकसानशिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ येथील व्हिक्टोरिया ॲग्रो फूड आणि प्रोसेसिंग प्रायव्हेट कारखान्याला शुक्रवारी(ता.14) दुपारच्यावेळी भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत कारखान्यातील सुमारे 40 लाख रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
Girish Mahajan : खडसेंना दिल्या होळीच्या निमित्ताने सर्व रंगाच्या, अंगाच्या शुभेच्छाएकनाथ खडसे यांना होळी सणाच्या निमित्ताने सर्व रंगाच्या सर्व अंगाच्या शुभेच्छा नेहमीच असल्याचे वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. राज्यात सध्या विरोधकच शिल्लक नाहीत, जे थोडेफार आहेत त्यांनी पाच वर्ष आता आराम करावा, असे आवाहन गिरीश महाजन यांनी केले आहे. राज्यात सध्याकाही चांगल्या सूचना असल्यास त्या सरकारला सुचवाव्यात असेही मंत्री गिरीश महाजन म्हणाले. धुलीवंदनाच्या निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात बोलताना गिरीश महाजन यांनी तरुणांना व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला दिला.
Satish Bhosle : शिरुर-कासार येथील न्यायालयात केले हजरमारहाण प्रकरणातील आरोपी सतीश भोसले उर्फ खोक्या भाई याला शुक्रवारी प्रयागराजवरुन छत्रपती संभाजीनगरमध्ये आणण्यात आले. त्यानंतर खोक्या भाईला शिरुर-कासार येथील न्यायालयात हजर करण्यात आले. या सुनावणीअंती न्यायालयाने सतीश भोसले याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यामुळे आता 20 मार्चपर्यंत खोक्याचा मुक्काम पोलीस कोठडीत असणार आहे. यावेळी सतीश भोसले याच्या वकिलांनीही आपली बाजू मांडली.
Beed Police News : तृप्ती देसाईंना नोटीसबीड पोलिसांनी तृप्ती देसाईंना नोटीस बजावली आहे. वाल्मिक कराडचे निकटवर्तीय २६ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहिती सादर करण्यासाठी त्यांना हजर राहण्यास सांगितले आहे. देसाई यांनी याबाबत पोलिसांत तक्रार केली आहे. त्यावर पोलिसांकडून जबाब नोंदवला जाणार आहे.
Jayant Patil News : जयंत पाटील बारामतीतराष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील आज बारामतीत आहे. त्यांच्या नाराजीच्या चर्चेवर त्यांनी आज शरद पवारांचीही भेट घेतली. बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रांची त्यांनी पाहणी केली. यावेळी पाटील यांनी नाराजीच्या चर्चेवर स्पष्टीकरण देताना सांगितले की, मी नाराज वगैरे काही नाही. मला आता बाहेर बोलायची चोरी झाली आहे. मी भाषण केलेल्याचा रेफरन्स बघा. राजू शेट्टींना बोलताना मी आंदोलनाच्या अनुषंगाने विधान केले होते, असे जयंत पाटील म्हणाले आहेत. राजू शेट्टी यांचा आमच्यावर विश्वास नाही, त्यांना आम्ही उभं राहायला सांगत होतो. त्यामुळे माझं काही तुम्ही खरं धरू नका. तुम्ही तुमचे आंदोलन सुरू ठेवा, त्याला पाठिंबा आहे, अशी माझी भावना होती, असे पाटील म्हणाले आहेत.
Marathi Saint Literature Warkari Conference : यंदाचे मराठी संत साहित्य वारकरी संमेलन शिर्डीत; 22 मार्चला संमेलनाचे उद्घाटनयंदाचे वारकरी साहित्य परिषदेचे 13वे मराठी संत साहित्य वारकरी संमेलन शिर्डी 22 आणि 23 मार्चला होईल. संत तुकाराम महाराजांचे वंशज संजय महाराज देहूकर संमेलनाध्यक्ष असतील. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील स्वागताध्यक्ष असणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार , मराठी भाषा मंत्री उदय सामंत, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते संमेलनाला उपस्थित राहतील.
Satish Bhosale arrested : सतीश भोसले ऊर्फ खोक्याभाई याला सात दिवसांची पोलिस कोठडीभाजप आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय गुंडा सतीश भोसले ऊर्फ खोक्याभाई याला सात दिवसांची पोलिस कोठडी शिरूर कासार न्यायालयाने सुनावली आहे. सतीश भोसले याची दहशतीचे व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होताच, त्याच्यविरोधात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून तो पसार होता. पोलिसांनी त्याला प्रयागराज येथून अटक केली आहे.
Sambhaji Brigade : मंत्री नीतेश राणेंचा राजीनामा घ्या, हकालपट्टी करा; संभाजी ब्रिगेडची मागणीसंभाजी ब्रिगेडचे शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष सोमनाथ कराळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत, राज्य मंत्रिमंडळातून मंत्री नीतेश राणे यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. संविधानिक पदावर असताना अत्यंत बेजबाबदार खोटं वक्तव्य करून धार्मिक व सामाजिक तेढ निर्माण केले आहे, त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात ठेवू नका, असेही निवेदनात म्हटले.
Supriya Sule : जयंत पाटील भाग्यवान, हे प्रत्येकाला हवे हवेसे झालेत; सुप्रिया सुळेंचा सत्ताधाऱ्यांना टोलाजयंत पाटील किती भाग्यवान आहे बघा, ते प्रत्येकाला हवे हवेसे वाटत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जयंत पाटील यांच्यावरून सत्ताधाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या चर्चांवर टोला लगावला आहे.
Ahilyanagar Zilla Parishad : अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे सन 2025-26 आर्थिक वर्षांसाठी 52 कोटी अंदाजपत्रक सादरअहिल्यानगर जिल्हा परिषदेचे सन 2025-26 या आर्थिक वर्षांचे 52 कोटी 54 लाख 90 हजार 426 रुपयांचे मूळ अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी अंदाजपत्रक जाहीर केले. यात जिल्हा परिषद शाळेत ओपन सायन्स पार्क उभारणी, मिशन आरंभ, सुरभि सुरक्षा अभियानासह ड्रोन फवारणी यंत्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र इमारतीवर सौर ऊर्जा प्रणाली स्थापित करणे यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.
Ahilyanagar Crime Update : राष्ट्रवादी काँगेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा युवक प्रदेश उपाध्यक्षावर फसवणुकीचा गुन्हा दाखलविधानसभेचे तिकीट मिळवून देतो म्हणून काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय ओबीसी समन्वयक मंगल भुजबळ यांच्याकडून टोकन म्हणून दीड लाख उकळले. याप्रकरणी राष्ट्रवादी काँगेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे युवक प्रदेश उपाध्यक्ष बालराजे पाटील याच्याविरुद्ध फसवणुकीचा कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
Sharad Pawar live: पवारांनी पीक पद्धतीची पवारांनी घेतली माहितीमाजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आज बारामतीत कृषी विज्ञान केंद्रास भेट दिली.नवनवीन प्रयोग आणि तंत्रज्ञान व पीक पद्धतीची माहिती घेतली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.
Nira-Bhima Factory Election: नीरा-भीमा कारखान्याची हर्षवर्धन पाटलांचं वर्चस्व कायमपुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली आहे. भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांचा कारखान्यावर दबदबा कायम राहिला आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 21 जागांसाठी 21 अर्ज राहिल्याने निवडणूक बिनविरोध झाली. आतापर्यंत 1999 HEMTV संस्थापक हर्षवर्धन पाटलांच्या नेतृत्वात कारखान्याच्या सर्व निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत.
Satish Bhosale News : अतिक्रमणात काढलेलं घर पेटवलंवन विभागाने सतीश भोसले उर्फ खोक्याच्या ग्लास हाऊस नावाच्या घरावर बुलडोझर चालवला होता. अशातच आता या पाडलेल्या घराला कोणतीरी आग लावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अज्ञातांकडून सतीश भोसलेच्या घराचा परिसर पेटविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामध्ये जनावरांचा चाऱ्यासह काही पशूंचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
Mumbai-Amravati Express Accident : मुंबई-अमरावती एक्सप्रेसला भरधाव ट्रकची धडकजळगाव जिल्ह्यातील बोडवड रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी पहाटे धक्कादायक अपघात घडला आहे. मुंबई-अमरावती एक्सप्रेसला एका भरधाव ट्रकने धडक दिल्यामुळे हा अपघात घडला. मात्र, रेल्वेच्या धीम्या गतीमुळे मोठा अनर्थ टळल. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
Devendra Fadnavis : गडचिरोलीला माईनिंग हब म्हणून विकसित करण्यासाठी केंद्राने सहकार्य करावे - CM फडणवीसमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी गडचिरोली मायनिंग हब, नागपूर विमानतळ, स्थानिक स्वराज्य संस्थांना वित्त आयोगाचा निधी या संदर्भात त्यांनी पंतप्रधानांशी चर्चा केली. यावेळी फडणवीस यांनी गडचिरोलीला माईनिंग हब म्हणून विकसित करण्यासाठी केंद्राने सहकार्य करावे, अशी मागणी केल्याचं माध्यमांना सांगितलं.
Satish Bhosale Arrest : सतीश भोसले उर्फ खोक्याला घेऊन पोलिस बीडकडे रवानासतीश भोसले उर्फ खोक्याला घेऊन बीड पोलिस छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी सतीश भोसलेला प्रयागराजमध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर काल रात्री बीड पोलीस भोसलेला ताब्यात घेऊन आज पहाटे छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावर दाखल झाले. तिथून आता पोलिस त्याला बीडला घेऊन निघाले आहेत. शिवाय आजच त्याला न्यायालयात हजर देखील केलं जाणार आहे.