कानगाव : देऊळगाव राजे (ता. दौंड) येथे ३ नोव्हेंबर २०१२ रोजी झालेल्या सभेमध्ये आमदार सदाभाऊ खोत यांनी भाषण केले होते. या भाषणामध्ये केलेल्या प्रक्षोभक वक्तव्यामुळे दौंड पोलिस ठाण्यामध्ये खोत यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष भानुदास शिंदे यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला होता.
या गुन्ह्यामधून १२ वर्षानंतर त्यांची निर्दोष मुक्तता केली. दौंड येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात १५ फेब्रुवारी २०२५ रोजी निकाल देण्यात दिला.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन तीन हजार रुपये भाव द्यावा, यासाठी तत्कालीन खासदार राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, वासुदेव काळे व शिंदे यांनी देऊळगाव राजे येथे सभा आयोजित केली होती. त्यात प्रक्षोभक भाषण केले म्हणून खोत यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.