…तर शेतकऱ्यांच्या मुद्यावर सरकारला लक्ष घालण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू : शरद पवार
Marathi March 15, 2025 06:24 PM

बारामती : शेतकरी आत्महत्या वाढल्यात, हे चित्र आपल्याला घालवायचा आहे. त्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारला लक्ष घालण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू. असे मत व्यक्त करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) चिंता व्यक्त केली आहे. बारामतीत कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर करून ऊस उत्पादनाची किमया व साखर उद्योगाचे आधुनिकरणासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये राज्यातील 102 साखर कारखान्यांनी सहभाग घेतला आहे. या कार्यक्रमाला शरद पवार, सुप्रिया सुळे, राजेंद्र पवार, बी.बी. ठोंबरे, प्रतापराव पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे आदी मान्यवर उपस्थित आहे. या ठिकाणी मार्गदर्शन करताना शरद पवारांनी चिंता व्यक्त केली आहे.

पुढच्या 3 ते 4 वर्षात उसाचे उत्पादन वाढेल आणि क्रांती होईल

महाराष्ट्रामध्ये 200 च्या आसपास साखर कारखाने आहेत. आज साखर कारखाने अडचणीत आहे. पण ज्यांच्याकडे हे प्रश्न सोडण्याची जबाबदारी आहे त्यांचे लक्ष याच्याकडे किती आहे? लक्ष दिले जातंय अस मला वाटत नाही. आज आनंद आहे आणि नाराजी पण आहे. ज्यांच्याकडे नेतृत्व आहेत ते कुठं आहेत? आपण जिथं बसलो आहेत तिथून 20 मैलावर 4 कारखाने आहेत. कारखान्याचे नेतृत्व करणारे कुठं आहेत? हे गंभीरपणे घेतले पाहिजे. असेही शरद पवार म्हणाले. तर याचा निकाल आम्ही बसून लावू. आर्टिफिशयल ईटेलिजसमुळे आर्थिक गणित बदलंय. AIमुळे उत्पादन वाढत आहे. पुढच्या तीन ते चार वर्षात उसाचे उत्पादन वाढेल आणि क्रांती होईल. ऊस झाली की पुढच्यावेळी सगळ्या पिकावर AIचा वापर करतील.हे जिथं ऐकले ते इथेच सोडायचं नाही शिवारात न्यायचं. हे चित्र बदलण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू.

विदर्भ मराठवाड्यात 2706 शेतकरी आत्महत्या, ही चिंताजनक बाब

मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांची माहिती मिळतेय, ती चिंताजनक आहे. यासंदर्भात ठीक ठिकाणची माहिती एकत्रित करणार आहोत. या बाबत केंद्र सरकारने एखादं धोरण आखावं. त्यांनी मदत करण्यासंदर्भात काही नीती ठरवावी. सोमवारची पार्लमेंट संपल्यानंतर या  यामध्ये लक्ष घातले जाईल. असेही शरद पवार म्हणाले. विदर्भ, मराठवाड्यातील सुमारे 2706 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे पुढे आले आहे. यावर बोलताना शरद पवारांनी आपले मत व्यक्त केलं आहे.

हे ही वाचा

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.