Crorepati Mutual Fund: गेल्या काही वर्षांत भारतीय शेअर बाजाराने लोकांना श्रीमंत केले आहे. अनेक लोक थेट इक्विटीमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतात. SIP च्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून तुम्ही करोडपती देखील बनू शकता.
पण यासाठी तुमच्याकडे शिस्त, संयम आणि योग्य प्लॅन असणे महत्त्वाचे आहे. असाच एक फंड म्हणजे कॅनरा रोबेको इमर्जिंग इक्विटीज फंड. या फंडाने दरमहा 10,000 रुपये एसआयपी करणाऱ्यांना करोडपती बनवले आहे.
कॅनरा रोबेको इमर्जिंग इक्विटीज फंडाने 20 वर्षांत 10,000 रुपयांची मासिक SIP करणाऱ्या गुंतवणूकदारांचा फंड 1.9 कोटी केला आहे. फंड हाऊसकडून सांगण्यात आले की 10 वर्षांची एसआयपी वाढून 28.47 लाख रुपये झाली.
फंडाचा पोर्टफोलिओ 98 शेअर्समध्ये पसरलेला आहे. प्रमुख होल्डिंग्समध्ये ICICI बँक (7.07%), इंडियन हॉटेल्स (5.13%), आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स (4.04%) यांचा समावेश आहे. फंडाचा पोर्टफोलिओ लार्ज-कॅप स्टॉक्स (47%) कडे झुकलेला आहे. याशिवाय मिड-कॅप शेअर्स 35% आणि स्मॉल-कॅप शेअर्स 16% आहेत.
लार्ज कॅप आणि मिड कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूककॅनरा रोबेको इमर्जिंग इक्विटीज फंड लार्ज कॅप आणि मिड कॅप आकाराच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये 35-65% गुंतवणूक करतो. याशिवाय, कर्ज आणि मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट्समध्ये 0-30% इतका छोटा हिस्सा आहे.
फंडाने मागील वर्षी नियमित योजनेत 17.79% आणि थेट योजनेत 19.01% परतावा दिला आहे. फंडाने गेल्या एका वर्षात आणि गेल्या पाच वर्षात चांगला परतावा दिला आहे.
हा फंड अशा गुंतवणूकदारांसाठी आहे जे अधिक जोखीम घेऊ शकतात आणि तीन ते पाच वर्षांसाठी गुंतवणूक करू शकतात. फंड हाऊसच्या मते, एका वेळी किमान रु 5,000 ची गुंतवणूक केली जाऊ शकते, तर SIP द्वारे तुम्ही प्रत्येक महिन्याला रु. 1,000 च्या गुंतवणुकीने सुरुवात करू शकता. तुम्ही तुमचे युनिट एका वर्षाच्या आत विकल्यास, 1% एक्झिट लोड लागू होईल.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.