Latest Maharashtra News Updates : वानवडीत सेक्रेड वर्ल्ड इमारतीला आग; अग्निशमन दलाची तत्परता
esakal March 15, 2025 07:45 PM
Pune Live: वानवडीत सेक्रेड वर्ल्ड इमारतीला आग; अग्निशमन दलाची तत्परता

वानवडी येथील जगताप चौकातील सेक्रेड वर्ल्ड इमारतीच्या नॉर्थ ब्लॉकमध्ये अचानक आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. परिसरात धुराचे लोट पसरले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही.

Ambadas Danve: कायदा चुकीच्या कामांना पाठबळ देण्यासाठी नाही - अंबादास दानवे

जनतेचे पैसे वाया जाणार नाहीत, ही भूमिका वेगळी असली तरी अशा प्रवृत्तीला आळा घालण्याची गरज आहे. न्यायालयाने दोषी ठरवले नाही, याचा अर्थ हा कायदा चुकीच्या कामांना पाठबळ देण्यासाठी नाही. त्यामुळे योग्य कारवाई होणे आवश्यक आहे, अशी स्पष्ट भूमिका अंबादास दानवे यांनी मांडली.

Sanjay Raut live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदींची मानसिकता काय आहे हे कोणीही सांगू शकत नाही; खासदार संजय राऊत

शिवसेना (यूबीटी) खासदार संजय राऊत म्हणाले, असदुद्दीन ओवैसींची विचारसरणी वेगळी आहे. आम्ही वीर सावरकरांवर विश्वास ठेवतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींची मानसिकता काय आहे हे कोणीही सांगू शकत नाही. त्यांनी त्यांच्या पक्षाशी जुळणारे अनेक चित्रपट बनवले आहेत, मग ते ताशकंद फाइल्स असोत, काश्मीर फाइल्स असोत, छावा असोत किंवा द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर असोत.

Donald Trump live Updates: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यात चर्चा

युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धावर तोडगा काढण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यात चर्चा.

Nitesh Rane live Updates: भाजप नेते नितेश राणे यांच्या भूमिकेला नाशिकच्या खाटीक समाजाचा विरोध
  • हलाल पद्धतीनेच मटण विक्री करण्याचा खाटीक समाजाचा निर्णय

  • हलालच्या मुद्यावर वादळ उठलेले असताना खाटीक समाजाच्या बैठकीत झाला निर्णय

  • व्यवसायात जाती धर्माचा संबंध नाही, ते कोण आम्हाला प्रमाणपत्र देणारे?

  • नाशिकमधे झटका नाही तर हलाल पद्धतीनेच होणार मटण विक्री

Mark Carney live Updates: मार्क कार्नी यांनी घेतली शपथ

कॅनडाचे नवे पंतप्रधान म्हणून बँक ऑफ इंग्लंडचे माजी प्रमुख मार्क कार्नी यांनी घेतली शपथ.

तिथीनुसार शिवजयंतीच्या निमित्ताने शिवनेरीवर दीपोत्सव

तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीच्या निमित्ताने किल्ले शिवनेरीवर दीपोत्सव साजरा करण्यात आला. सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेन हा दीपोत्सव आयोजित केला होता.

एआयवर आधारीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी शऱद पवार साधणार संवाद

शरद पवार त्यांच्या बारामतीतील गोविंदबाग या निवासस्थानी असून त्यांच्या भेटीसाठी कार्यकर्त्यांनीन मोठी गर्दी केलीय. एआयवर आधारीत ऊस उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांशी शऱद पवार संवाद साधणार आहेत.

छत्रपती संभाजीनगरमध्ये माथेफिरूने जाळल्या दोन दुचाकी

छत्रपती संभाजीनगरच्या सिडको वाळुज महानगरातील साईनगर वसाहतीत मध्यरात्रीस नाईट गाऊन घालून आलेल्या अज्ञात माथेफिरूने दोन दुचाकी जाळल्याची घटना घडली. त्यामुळे रहिवासी नागरिकात मोठे भीतीचे आणि दहशतीचे वातावरण पसरले आहे. माथेफिरूने घरासमोर उभ्या असलेला मोटरसायकलला आग लावून पेटवून दिले असता आगीच्या झोताने घराच्या बाहेर असलेले इलेक्ट्रिक मिटर मोटर सायकल या आगीच्या घटनेत जळून भस्मसात झाले.

स्वाभिमानीच्या प्रमुख कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

शक्तिपीठ महामार्गाविरोधात सुरु असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटना कोल्हापुरात आंदोलन करणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

Sangli Dhamma Parishad LIVE : सांगलीत २३ मार्च रोजी धम्म परिषदेचे आयोजन

सांगली : बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कतर्फे जिल्ह्यात २३ मार्चला विष्णुदास भावे नाट्यगृहात बौद्ध धम्म परिषद होत आहे. जिल्ह्यात धम्म चळवळीला गती देण्यासाठी ही परिषद होत असून राज्यभरातील धम्म अभ्यासक व धम्म प्रचारकांची उपस्थिती आहे. होलार समाजाचे नेते व ज्येष्ठ धम्म प्रचारक एस. के. ऐवळे, उद्योजक सी. आर. सांगलीकर प्रमुख पाहुणे आहेत.

Dr. Tara Bhawalkar LIVE : भाई वैद्य स्मृती गौरव पुरस्कार डॉ. तारा भवाळकर यांना घोषित

सांगली : भाई वैद्य फाउंडेशन व आरोग्य सेनेतर्फे दिला जाणारा लोकनेते भाई वैद्य स्मृती गौरव पुरस्कार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांना घोषित झाला आहे. रविवारी (ता. १६) श्वास हॉस्पिटलच्या सभागृहात वितरण आहे. दुपारी ४.३० वाजता होणाऱ्या समारंभासाठी आरोग्य सेनेचे अध्यक्ष डॉ. अभिजित वैद्य अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.

Sindhudurg Heat Wave : उष्णतेच्या लाटेने सिंधुदुर्ग जिल्हा होरपळला

वैभववाडी : उष्णतेच्या लाटेने सिंधुदुर्ग जिल्हा होरपळला असून, अंगाची लाहीलाही होत असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात आहे. दुपारी १२ ते ४ या वेळेतील उन्हाच्या झळा सहन करण्यापलीकडे वाढल्या आहेत. दरम्यान, गेल्यावर्षीच्या तुलनेत तापमानात अडीच ते तीन अंश सेल्सिअसने वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

Gujarat Accident LIVE : भरधाव चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक; महिलेचा मृत्यू, चार जण जखमी

वडोदरा, गुजरात: एका भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. तर, इतर चार जण जखमी झाले आहेत.

Indrayani River : तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा आदेश जारी; 'इंद्रायणी'चे पाणी पिण्यास केली मनाई

पुणे : तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाचे आदेश काढले आहेत. इंद्रायणी नदीचे पाणी पिण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी सक्त मनाई केलीये. तुकाराम महाराज बीज सोहळ्यासाठी येणाऱ्या वारकऱ्यांनी इंद्रायणी येथील पाणी वापरण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई आदेश काढला आहे. तुकाराम बीज सोहळा 14 ते 16 मार्च रोजी असून या दिवशी हजारो वारकरी इंद्रायणी स्नान करून पवित्र पाणी म्हणून पितात त्यास आता मनाई करण्यात आली आहे.

Ichalkaranji News : इचलकरंजीत दोन गटांत जोरदार राडा, १३ जणांना अटक

इचलकरंजी : सहकारनगर, साईट नं. १०२ परिसरात किरकोळ कारणावरून दोन गटांत झालेल्या राड्यात एका गटाने चारचाकीच्या काचा फोडीत दहशत निर्माण केली. याप्रकरणी दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या असून, पोलिसांनी १३ जणांना अटक केली. सेंट्रिंग व्यावसायिक दत्ता तुकाराम देडे यांच्या तक्रारीनुसार १६ जणांवर गुन्हा दाखल केला.

Germany Gang : जर्मनी टोळीच्या एकाला इचलकरंजी पोलिसांनी घटनास्थळी फिरवले

इचलकरंजी : कामगार चाळ परिसरात नऊ महिन्यांपूर्वी झालेल्या दोन गटांतील हाणामारी प्रकरणातील जर्मनी टोळीच्या पसार आरोपीला अखेर शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. साहिल हबीब फणीबंद (वय २७, रा. जवाहरनगर) असे त्याचे नाव आहे. न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती. दरम्यान, तपासाच्या उद्देशाने पोलिसांनी फणीबंदला घटनास्थळी फिरवले.

Karanjeshwari Shimgotsav : करंजेश्वरीचा शिमगोत्सव उत्साहात, फुलांचा वर्षाव ढोल-ताशांचा गजर आणि जयघोष

चिपळूण : सलग चार दिवस भक्ती, उत्साह, आनंद व जल्लोषाने साजरा करण्यात आलेला श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरी देवस्थानच्या शिमगोत्सवाची शुक्रवारी सायंकाळी अभूतपूर्व उत्साहात सांगता झाली. या सांगता समारंभाला एखाद्या यात्रेचे स्वरूप आले होते. दोन्ही पालख्यांचा प्रदक्षिणा सोहळा पाहून अनेक भाविक अक्षरशः भारावून गेले. चिपळूण शहरातील गोवळकोट-पेठमाप येथील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देवी करंजेश्वरी व श्री देव सोमेश्वर देवस्थानचा शिमगोत्सव यावर्षी ११ मार्चला सुरू झाला. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणूनही या शिमगोत्सवाकडे पाहिले जाते.

Milk Rate LIVE : दुधाच्या दरात होणार दोन रुपयांची वाढ; कात्रज डेअरीत झालेल्या बैठकीत निर्णय

पुणे : महागाईचा चटका सर्वसामान्यांना सगळीकडे बसत असताना आता दुधाच्या दरातही २ रुपयांनी वाढ होणार आहे. दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, कात्रज डेअरीमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या वेळी विविध सहकारीसह खासगी संघांचे ४७ प्रतिनिधी उपस्थित होते.

Satish Bhosale LIVE : कुख्यात गुंड सतीश भोसले ऊर्फ खोक्याला सात दिवसांची पोलिस कोठडी

Latest Marathi Live Updates 15 March 2025 : कुख्यात गुंड सतीश भोसले ऊर्फ खोक्या याला प्रयागराज येथे अटक करून पोलिसांनी विमानाने छत्रपती संभाजीनगर येथे आणल्यानंतर कडेकोट बंदोबस्तात शिरूर कासार पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले. वैद्यकीय तपासणी करून त्याला न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. तसेच महागाईचा चटका सर्वसामान्यांना सगळीकडे बसत असताना आता दुधाच्या दरातही २ रुपयांनी वाढ होणार आहे. दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, कात्रज डेअरीमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. उष्णतेच्या लाटेने सिंधुदुर्ग जिल्हा होरपळला असून, अंगाची लाहीलाही होत असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात आहे. आलमट्टी धरणाची उंची ५१९.६० मीटरवरून ५२४.२६ मीटरपर्यंत वाढविण्याचा कर्नाटक राज्य सरकार गांभीर्याने विचार करत आहे. शित्तूर तर्फ मलकापूर (ता. शाहूवाडी) येथील जवान सुनील विठ्ठल गुजर (वय २७) यांचा मणिपूर येथे सेवा बजावत असताना डोजर खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात मृत्यू झाला. त्याचबरोबर राज्यातील वातावरणात आता बदल पहायला मिळत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.