पिंपरी, ता. १५ ः आकुर्डी येथील दत्तवाडी विठ्ठलवाडी, विवेक नगर, क्रांतीनगर, टेल्को कपूर, कॉलनी, एकता नगर, गंगा नगर, पंचतारा नगर, गुरुदेव नगर, शुभ श्री सोसायटी परिसर भंगारवाडी गणेशनगर या सर्व परिसरामधील नाले-ओढे, सांडपाणी वाहिनीची स्वच्छता व साफसफाई करण्याची मागणी विठ्ठल प्रतिष्ठानचे अध्यक्ष निखिल दळवी यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘आकुर्डीमधील बऱ्याच भागांमध्ये पावसाचे पाणी परिसरात शिरते व काही भागात नागरिकांच्या घरातही शिरते. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. ओढा नाल्यालगत असणाऱ्या परिसरामध्ये नाला ओव्हर फ्लो झाल्यावर आजूबाजूच्या परिसरात असलेल्या घरांमध्ये पाणी शिरते व त्यांच्या जनजीवन विस्कळित होते व त्यांच्या घरातील वस्तूंचे नुकसान होते. तरी प्रभाग क्रमांक १४ व प्रभाग क्रमांक १५ मधील सर्व परिसरातील नाल्यांची स्वच्छता करून घ्याव्या व काही दुरुस्ती करावी.’’