ALSO READ:
मिळालेल्या माहितीनुसार बसेसच्या कमतरतेचा सामना करत असलेले महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) त्यांच्या ताफ्यात ३,००० नवीन बसेस जोडणार आहे. यासाठी ई-निविदाही जारी करण्यात आली असून या बसेस ११ मीटर लांबीच्या असतील. या खरेदीसाठी परिवहन महामंडळाने नुकत्याच जारी केलेल्या ई-निविदेत बोली लावण्याची शेवटची तारीख १४ मे आहे आणि ती दुसऱ्या दिवशी उघडली जाईल. तसेच एमएसआरटीसी डिझेल इंजिन बसेस खरेदी करत आहे कारण या बसेस लांब पल्ल्याचे प्रवास करतात आणि ग्रामीण भागात प्रवास करतात. यासोबतच, इंजिन आणि वाहनाच्या देखभालीसाठी ७ वर्षांचा करार असेल. या कराराअंतर्गत, ज्याला हे कंत्राट मिळेल त्याला ७ वर्षांचा वार्षिक देखभाल करार देखील करावा लागेल, ज्यामध्ये कंत्राटदारांना इंजिन आणि संबंधित यंत्रणेची देखभाल करावी लागेल तर इतर भागांची देखभाल एमएसआरटीसी मेकॅनिक करतील. १४,५०० बसेस कार्यरत आहे.ALSO READ:
सध्या, एमएसआरटीसीकडे २५१ डेपो आणि ३१ विभागांचे विशाल नेटवर्क असून १४,५०० हून अधिक बसेस चालवल्या जातात. पण, त्यातील अनेक बस जुन्या झाल्या आहे. सणासुदीच्या काळात लोकांना बसेसच्या कमतरतेचा सामना करावा लागतो आणि महाराष्ट्रातील अनेक रस्त्यांवर बसेस तुडुंब भरलेल्या असतात.ALSO READ:
Edited By- Dhanashri Naik