बिबट्यांकडून चक्क कचरा डेपोत अन्नाचा शोध सुरू असल्याचा व्हिडिओ सोशल माध्यमावर व्हायरल होतोय.. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील हा व्हिडीओ आहे.. कोतुळ गावातील कचरा कुड्यांजवळ रात्रीच्या वेळी बिबटे येऊन प्लास्टिक पिशव्यांमध्ये फेकलेले चिकन मटण शोधून खात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.. अकोले शहरात देखील रात्रीच्यावेळी कचरा डेपोत येऊन बिबटे अन्नाचा शोध घेत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे.. अनेकदा भटकी कुत्री कचरा कुड्यांमध्ये अन्नाचा शोध घेत असतात मात्र आता बिबटे देखील कचरा डेपो आणि कचरा कुड्यांमध्ये अन्नाचा शोध घेत असल्याचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय...
संत तुकाराम महाराजांच्या चिपळ्या, गाथ्याचे दर्शन घेता येणारसंत तुकाराम महाराज आपल्या दैनंदिन भजन कीर्तनात वापरत असलेल्या चिपळ्या आज तुकाराम बीजे निमित्त पंढरपुरात दर्शनासाठी ठेवण्यात आले आहेत. संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज बाळासाहेब महाराज देहुकर यांनी तुकाराम महाराजांच्या चिपळ्या, पादुका आणि अभंगाच्या हस्तलिखिताची वही असा 400 वर्षांपूर्वीचा दुर्मिळ ठेवा पंढरपुरात सर्वांसाठी खुला केलाय. यंदा संत तुकाराम महाराजांचे त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. या निमित्ताने या दुर्मिळ चिपळ्या पादुका आणि हस्तलिखिरे भाविकांना पाहायला मिळत आहेत.
नौदलाची आयएनएस 'गुलदार' नौका विजयदुर्ग बंदरात दाखल.भारतीय नौदल सेवेतून निवृत्त झालेली आयएनएस 'गुलदार' ही नौका महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे (MTDC) सुपुर्द करण्यात आली आहे. ही नौका वेंगुर्ले 'निवती रॉक' जवळ समुद्रात पाण्याखालील संग्रहालयात रूपांतरित करण्यात येणार आहे.
सध्या ही नौका विजयदुर्ग बंदरात आणण्यात आली आहे. पाण्याखालील संग्रहालय होणारा भारतातील हा पहिला उपक्रम आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गाची ओळख आता पाण्याखालील पर्यटनस्थळ म्हणून होणार आहे.
भारतीय नौदलातून निवृत्त झालेल्या युद्धनौकेचा अशा प्रकारे पुनर्वापर करण्याचा हा देशातील पहिलाच उपक्रम आहे. सेवेतून निवृत्त झालेल्या नौकांना कृत्रिम खडकांमध्ये रूपांतरित करून सागरी पर्यावरण व पर्यटनासाठी याचा पुनर्वापर करण्यात येणार आहे.
डंपरची धडक, शाळकरी मुलाचा मृत्यूवाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव डंपरची धडक बसल्यामुळे गाडीखाली सापडून शाळकरी विद्यार्थिनी जागीच ठार झाली. ही घटना आज सकाळी पाट तिठा परिसरात घडली. मनस्वी सुरेश मेथर (वय १५) असे त्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती अभ्यास करण्यासाठी आपल्या मैत्रिणीकडे जात असताना ही घटना घडली. दरम्यान याबाबतची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी निवती पोलीस दाखल झाले आहेत. पंचनामा सुरू आहे. दरम्यान संबंधित डंपर चालकावर कारवाई करण्यात यावी या मागणी करण्यासाठी त्या ठिकाणी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.
वाढत्या तापमानामुळे सर्वसामान्य नागरिकांचा आरोग्यावर परिनंदुरबार जिल्ह्याचा तापमानात सातत्याने वाढ होताना पाहायला मिळत आहेत गेल्या काही दिवसांपूर्वी असलेला 37 अंश सेल्सिअस तापमान अचानक 40°c पर्यंत पोहोचल्याने जिल्ह्यात नागरिक उन्हापासून त्रस्त झालेले आहेत सातत्याने नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पार हा वाढत असून त्याचा परिणाम आता सर्वसामान्य नागरिकांना होताना पाहायला मिळत आहेत...
Maharashtra News Live Updates: किल्ले शिवनेरी गडावर ११ वाजता खासदार निलेश लंकेच्या यांच्या उपस्थितीत शिवनेरी गडावर स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे त्याआधीच शिवाई देवी मंदिर परिसरात मधमाश्यांनी अचानक हल्ला केलाय एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्रीया महाराष्ट्रात संतांच्या केसाला ही धक्का लागू देणार नाही Beed News : भाजप आमदार सुरेश धस आज सतीश भोसले उर्फ खोक्याच्या कुटुंबाची भेट..भाजप आमदार सुरेश धस आज सतीश भोसले उर्फ खोक्याच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी येणार आहेत.. वन विभागाने कारवाई करत खोक्याचे घर पाडले होते तर त्याच दिवशी मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी जाळपोळ आणि मारण्याची घटना घडली होती.. या घटनांच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार सुरेश धस आज भोसले कुटुंबाची भेट घेणार आहेत. दुपारी अडीच वाजता भेट घेण्यासाठी शिरूर कासार येथील झापेवाडी येथे जाणार आहेत.