Latest Maharashtra News Updates : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षांसाठी मुदतवाढ
esakal March 16, 2025 06:45 PM
Pune Live: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षांसाठी मुदतवाढ

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांसाठी अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीत वाढ केली आहे. पदवी अभ्यासक्रमांसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे, तर पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी २० मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आणि नव्या शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने यंदा प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक लवकर जाहीर केले आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन प्रवेश परीक्षा ३ ते ५ जून दरम्यान आयोजित केली जाणार आहे.

पुणे विद्यापीठातील विविध विभागांतील प्रवेश परीक्षांच्या अर्ज भरायला मुदतवाढ

पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली

पदवी अभ्यासक्रमासाठी ३० एप्रिलपर्यंत, तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेसाठी २० मे पर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे

विद्यार्थी व पालकांची मागणी आणि नव्या शिक्षण धोरणाची अंमलबजावणी विचारात घेऊन यंदा लवकर प्रवेश परीक्षा घेण्याचे नियोजन विद्यापीठाने केले आहे

पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन प्रवेश परीक्षा ३ ते ५ जुन दरम्यान घेतली जाणार आहे

Live : विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून तीन उमेदवारांची नावं जाहीर

भाजपाकडून आज विधान परिषद निवडणुकीसाठी तीन उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. दादाराव केचे, संजय केनेकर आणि संदीप जोशी यांना पक्षाकडून संधी देण्यात आली आहे.

एआर रहमान यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात केलं दाखल

प्रसिद्ध संगीतकार एआर रहमान यांना छातीत दुखू लागल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. चेन्नईतील अपोलो रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.

मोदी जाताना देशाचे तुकडे करून जातील, १० वर्षात दोन राष्ट्र निर्माण झाल्याची राऊतांची टीका

मोदी शहांचे राज्य एक दिवस जाणारच आहे. पण जाताना ते देशाचे तुकडे करून जातील. गेल्या दहा वर्षात भारतात हिंदू आणि मुसलमान अशी दोन राष्ट्र निर्माण झाली आहेत. हे वातावरण फाळणीसदृष्य असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरात केलीय.

विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा, तापमानात प्रचंड वाढ

राज्यात तापमानात प्रचंड वाढ झाली असून विदर्भात उन्हाचा प्रचंड कडाका आहे. हवामान खात्यानेही विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय.

Beed : खोक्यानंतर आणखी एकामुळे सुरेश धस अडचणीत

सतीश भोसले उर्फ खोक्यानंतर आता आणखी एका कार्यकर्त्यामुळे सुरेश धस अडचणीत आले आहेत. आशिष विशाळ असं त्याचं नाव असून संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांना मदतीच्या नावाखाली अधिकाऱ्यांकडून पैसे गोळा केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. दरम्यान, सुरेश धस यांनी हा आपला कार्यकर्ता नसल्याचं म्हटलंय.

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच्या पुतण्याची हत्या

पाकिस्तानात लष्कर ए तय्यबाच्या मोस्ट वाँटेड दहशतवाद्याची हत्या करण्यात आलीय. हाफिज सईदचा तो पुतण्या होता. त्याच्यासोबत असलेली एक व्यक्ती जखमी झाली असून ती हाफिज सईद असल्याचा दावा केला जात आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.