मंचर, ता.१६ : आदर्शगाव भागडी (ता.आंबेगाव) येथील आदर्श गाव योजनेचे अध्यक्ष रामदास छबूराव आगळे (वय ७१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
राज्य शासनाच्या आदर्श गाव योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करून एकेकाळी दुष्काळी असलेले भागडी गाव पाणीदार करण्यात आगळे यांचा सक्रिय सहभाग होता. राज्य शासनाने भागडी गावाला आदर्श राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देऊन सन्मानित केले. सामाजिक, शैक्षणिक व विकास कामातही त्यांचा पुढाकार होता. सुनील रामदास आगळे, नितीन रामदास आगळे व संतोष रामदास आगळे हे त्यांचे चिरंजीव.
12783