जुन्नर, ता.१६: प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने संच मान्यता शासन निर्णयाच्या विरोधात सोमवारी (ता. १७) पुणे येथे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब लांघी व जिल्हाध्यक्ष सुनील वाघ यांनी दिली.
निर्णयामुळे शिक्षकांचे मोठे नुकसान होणार असल्याने शिक्षक समितीने शिक्षकांच्या हिताच्या दृष्टीने निर्णयाचे विरोधात रस्त्यावर उतरणार आहे. शिक्षकांनी १७ मार्च रोजी सकाळी ११ ते २ या वेळेत जिल्हा परिषद, पुणे येथे धरणे आंदोलनाला उपस्थित राहावे, असे आवाहन राज्य कोषाध्यक्ष नंदकुमार होळकरा व पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या ऑनलाइन सहविचार सभेत व्यक्त केले आहे.
दरम्यान, शिक्षक आस्थापनेवर होणाऱ्या विपरीत परिणामांबरोबर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर प्रतिकूल परिणाम होणार आहे. यासाठी शासन आदेश रद्द होणे आवश्यक आहे असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. यावेळी कोषाध्यक्ष सुनील लोणकर, विश्वनाथ कौले, संतोष राक्षे, शरद निंबाळकर, प्रिया दसगुडे, महादेव माळवदकर पाटील, चंद्रकांत डोके, अविनाश चव्हाण, कुंडलिक कांबळे, राजेंद्र शेळकंदे, राजेश दुरगुडे, सुनील शिंदे, शरद धोत्रे, सुनीलतात्या कुंजीर, अनिल तळपे, संदीप दुर्गे, बापू खळदकर, शंकर जोरकर, सुरेश खोपडे, सुरेश आदक, सचिन हिलाल विविध तालुक्याचे अध्यक्ष सरचिटणीस पदाधिकारी सहभागी झाले होते.